Video: मृण्मयी देशपांडेची मातीशी नाळ! नवऱ्यासोबत स्वतःच्या हाताने शेतावर बांधली ही खास गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2024 12:47 IST2024-04-14T12:45:40+5:302024-04-14T12:47:50+5:30

मृण्मयीने महाबळेश्ववरला तिच्या फार्महाऊसवर स्वतःच्या हाताने नवऱ्याच्या मदतीने एक खास गोष्ट बांधली आहे (mrunmayee deshpande)

Mrunmayee Deshpande build soil house at her farmhouse in mahabaleshwar | Video: मृण्मयी देशपांडेची मातीशी नाळ! नवऱ्यासोबत स्वतःच्या हाताने शेतावर बांधली ही खास गोष्ट

Video: मृण्मयी देशपांडेची मातीशी नाळ! नवऱ्यासोबत स्वतःच्या हाताने शेतावर बांधली ही खास गोष्ट

मृण्मयी देशपांडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. मृण्मयीने 'बॉम्बे डायरीज' या वेबसिरीजच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यात हिंदी सिनेसृष्टीवर सुद्धा स्वतःची छाप सोडली आहे. मृण्यमी सध्या मुंबईत राहत नसून ती तिचा नवरा स्वप्नील रावसोबत मुंबईबाहेर निसर्गाच्या सानिध्यात वास्तव्यास आहे. मृण्मयीने सोशल मीडियावर याविषयी एक व्हिडीओ शेअर केलाय. यात मृण्मयीने तिच्या फार्म हाऊसच्या आवारात नवऱ्यासोबत एक खास गोष्ट निर्माण केलंय. 

मृण्मयीने शेअर केलेल्या व्हिडीओत पाहायला मिळतं की, तिचा नवरा स्वप्नील राव एक घर दाखवत आहे. हे घर मातीचं असून मृण्मयी - स्वप्नील यांनी स्वतःच्या हाताने हे घर बांधलं आहे. मृण्मयी - स्वप्नील यांनी त्यांच्या शेतावर हे घर बांधलं आहे. शेतावरती काहीतरी नवं…हातानी बांधलेलं… प्रेमानी बांधलेलं… असं खास कॅप्शन देत मृण्मयीने हा व्हि़डीओ शेअर केलाय. 

हा व्हिडीओ पाहताच मृण्मयी - स्वप्नील या नवरा- बायकोने त्यांची मातीशी जोडलेली नाळ दिसून येते. मृण्ययी सध्या तिच्या नवऱ्यासोबत महाबळेश्वरला राहते. हे दोघं तिथे शेती करुन विविध फळं आणि भाज्यांची लागवड करताना दिसतात. मृण्मयी देशपांडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर... ती लवकरच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा सिनेमा १ मे २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय.

Web Title: Mrunmayee Deshpande build soil house at her farmhouse in mahabaleshwar