इरकली साडीत खुललं मृण्मयी देशपांडेचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:30 IST2020-02-13T06:30:00+5:302020-02-13T06:30:00+5:30

मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर इरकली साडीतील फोटो शेअर केला आहे.

Mrinmayee Deshpande shared photo in Irkali Saree, see her photo | इरकली साडीत खुललं मृण्मयी देशपांडेचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

इरकली साडीत खुललं मृण्मयी देशपांडेचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

कट्यार काळजात घुसली', नटसम्राट, 'स्लॅमबुक' सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. 'अग्निहोत्र', 'कुंकू' यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. 

मृण्मयी देशपांडे हिने इंस्टाग्रामवर इरकली साडीतील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर मृण्यमयीने फर्जद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.


मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित ‘मन फकीरा’ हा चित्रपट व्हॅलेन्टाईन्स डेच्या निमित्ताने म्हणजेच १४ फेब्रुवारी २०२० रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. मृण्मयी देशपांडे या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत असून नुकतेच निर्मात्यांनी या सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील आणि अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 


मृण्मयी देशपांडे म्हणते की, ‘मन फकिरा’ हा ट्रेंड सेटिंग चित्रपट असून तो नातेसंबंधांवर भाष्य करतो आणि आजची पिढी ज्या नातेसंबंधांकडे खुल्या नजरेने पाहते त्याच्याबद्दल बोलतो.

Web Title: Mrinmayee Deshpande shared photo in Irkali Saree, see her photo