मिथिला पालकरच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा, जाणून घ्या का ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 15:49 IST2020-03-20T15:48:08+5:302020-03-20T15:49:06+5:30

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे.

Mithila palkar shares her stunning photo social media gda | मिथिला पालकरच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा, जाणून घ्या का ते

मिथिला पालकरच्या 'या' फोटोची सोशल मीडियावर होतेय चर्चा, जाणून घ्या का ते

मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत मिथिला पालकरने अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले आहे. आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी आणि एक उत्स्फूर्त तसेच कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. मिथीला कप साँगमुळे अल्पवधीतच साऱ्यांची लाडकी बनली होती. तिने वेबविश्वात अक्षरक्षः धुमाकूळ घातला होता. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते.

सिनेइंडस्ट्रीत जोरदार एंट्री केल्यानंतर तिच्या अभिनयासह तिच्या बोल्ड फोटोची ही वारंवार चर्चा होत असते. मिथिला सोशल मीडियावर तिच्या हॉट अँड बोल्ड फोटोंची चर्चा असते. मिथिला ब्लॅक रंगाच्या वनपीस मधला तिचा फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. यात फोटोतल्या तिच्या अदा चाहत्यांना घायाळ करणाऱ्या आहेत. फोटोवर फॅन्सकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करण्यात आला आहे. सध्या मिथिलाच्या या फोटोची सोशल मीडियावरदेखील चांगलीच चर्चा आहे.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar shares her stunning photo social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.