मिथिला पालकरचा घायाळ करणारा हा फोटो पाहाच, फोटोला मिळालेत इतके लाख लाईक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 07:15 IST2020-01-15T07:15:00+5:302020-01-15T07:15:00+5:30

विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते.

Mithila palkar share her new photo on instagram | मिथिला पालकरचा घायाळ करणारा हा फोटो पाहाच, फोटोला मिळालेत इतके लाख लाईक्स

मिथिला पालकरचा घायाळ करणारा हा फोटो पाहाच, फोटोला मिळालेत इतके लाख लाईक्स

गर्ल इन द सिटी' आणि 'लिटील थिंग्स' या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री मिथिला पालकर हिने मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूडमध्ये कमी कालावधीत आपली ओळख निर्माण केली आहे. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल.


मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. मिथिलाने  इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मिथिलाने पिच रंगाचा टॉप परिधान केले आहे आणि स्मित हास्य देतेय. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.


एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे.


इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. तर मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा 'चॉपस्टिक'मध्ये झळकली होती.

Web Title: Mithila palkar share her new photo on instagram