मिथिलाच साडीतला लूक तु्म्हाला करेल घायाळ, साडीतल्या तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 16:58 IST2020-01-31T16:35:25+5:302020-01-31T16:58:17+5:30

मिथिला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे.

mithila palkar looks beautiful in saree | मिथिलाच साडीतला लूक तु्म्हाला करेल घायाळ, साडीतल्या तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

मिथिलाच साडीतला लूक तु्म्हाला करेल घायाळ, साडीतल्या तिच्या फोटोची सोशल मीडियावर चर्चा

आजच्या तरुणाईचं प्रतिनिधीत्व करणारी अभिनेत्री म्हणजे मिथीला पालकर. एक उत्स्फूर्त आणि कायमच आपल्या आनंदी चेहऱ्यानं घायाळ करणारी अभिनेत्री म्हणूनही तिच्याकडे पाहिले जाते. इतकेच नाही तर आपल्या अभिनयाची जादूही मिथीलाने दाखवून दिली आहे. मिथीला आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच सजग आहे. कोणत्या कार्यक्रमात कशी स्टाईल आणि फॅशन असावी हे ती उत्तमरित्या जाणते.


मिथिलाने नुकतेच इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिने साडी परिधान केली आहे. तिचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचे दिसून येत आहे. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत.


अभिनेता आलोक राजवाडे आणि निपुण धर्माधिकारी यांच्यानंतर आता ‘गर्ल इन द सिटी’ आणि ‘लिटील थिंग्स’ या वेबसिरीजमधील भूमिकांमुळे ‘वेब क्वीन’ म्हणून ओळखली जाते. कपच्या तालावरील तिचे ‘हिची चाल तुरु तुरु...’ नेटिझन्ससह रसिकांनाही भावले होते. मात्र तेव्हापासून एक अभिनेत्री म्हणून तिने मिळवलेले यश नक्कीच कौतुकास्पद म्हणावे लागेल. इरफान खानसोबत 'कारवां' सिनेमातही ती झळकली होती. या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते. 

Web Title: mithila palkar looks beautiful in saree