'टॅटू काढताना नाही वाटली का भीती?', कोरोनाच्या लशीला घाबरणारी मिताली मयेकर झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:10 PM2021-09-30T14:10:23+5:302021-09-30T14:11:16+5:30

अभिनेत्री मिताली मयेकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

Mithali Mayekar, who was scared of corona vaccine, became a troll. | 'टॅटू काढताना नाही वाटली का भीती?', कोरोनाच्या लशीला घाबरणारी मिताली मयेकर झाली ट्रोल

'टॅटू काढताना नाही वाटली का भीती?', कोरोनाच्या लशीला घाबरणारी मिताली मयेकर झाली ट्रोल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मिताली मयेकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. मात्र आता ती वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.मितालीने नुकतेच कोरोना लशीचा पहिला डोस घेतला आहे आणि त्याचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे. तिला या व्हिडीओवरून ट्रोल करण्यात आले आहे.  

अभिनेत्री मिताली मयेकरने नुकताच सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती कोरोनाच्या लशीचा पहिला डोस घेताना दिसते आहे. मात्र लस घेताना ती जास्तच घाबरताना दिसते आहे. या व्हिडीओमध्ये इंजेक्शनला पाहून मिताली जास्तच अस्वस्थ झाल्याचे पहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून युजर्स मितालीला ट्रोल करत आहेत. 


नेटकऱ्यांचे असे म्हणणे आहे की, इतके टॅटू काढून घेतले तेव्हा तुला भीती नाही का वाटली. आता इतक्या साध्या इंजेक्शनला का घाबरते आहेस. दुसऱ्या युजरने म्हटले की, खूपच जास्त ओव्हर अॅक्टिंग.  इतके टॅटू काढलेस तेव्हा भीती वाटली नाही का? असेदेखील एका युजरने म्हटले. तर आणखी एकाने लिहिले की, तू टॅटू बनवले आहेस, लस तर ही एक छोटी गोष्ट आहे. मितालीच्या या व्हिडीओवरून खूप टीका केली जात आहे.

सिद्धार्थ आणि मितालीकडे मराठी इंडस्ट्रीमधील क्युट कपल म्हणून पाहिलं जातं. यावर्षांच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात मिताली आणि सिद्धार्थ लग्नाच्या बेडीत अडकले. बऱ्याचदा ते एकमेकांचे सोशल मीडियावर फोटो शेअर करताना दिसतात.

‘उर्फी’ चित्रपटातून मितालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर झी युवावरच्या ‘फ्रेशर्स’ मालिकेतही मितालीने काम केले. शेवटची ती लाडाची मी लेक गं या मालिकेत झळकली होती.

Web Title: Mithali Mayekar, who was scared of corona vaccine, became a troll.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.