मिताली मयेकरने सिद्धार्थ चांदेकरला लग्नानंतर दिलं हे गिफ्ट, खुद्द तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 18:39 IST2021-02-09T18:39:03+5:302021-02-09T18:39:57+5:30

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले.

Mithali Mayekar gave this gift to Siddharth Chandekar after marriage, she herself revealed | मिताली मयेकरने सिद्धार्थ चांदेकरला लग्नानंतर दिलं हे गिफ्ट, खुद्द तिनेच केला खुलासा

मिताली मयेकरने सिद्धार्थ चांदेकरला लग्नानंतर दिलं हे गिफ्ट, खुद्द तिनेच केला खुलासा

सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकरचे नुकतेच पुण्यातील ढेपेवाड्यात लग्न पार पडले. या लग्नाचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर मिताली मयेकर हिने सिद्धार्थ चांदेकरला गिफ्ट दिले आहे. नेमकं काय गिफ्ट दिले आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर लग्नानंतर काही दिवसात मिताली मयेकर हिने शॉर्ट हेअर कट केला. तिने हा हेअर कट सिद्धार्थसाठी केल्याचे सांगितले आहे.


इंस्टाग्रामवर मिताली मयेकरला एका चाहत्याने विचारले होते की, सध्याचा हेअरकट करण्यामागे काय कारण होते?, त्यावर मितालीने इंस्टाग्राम स्टोरीवर उत्तर दिले की, मी मोठ्या केसांना कंटाळले होते. तसेच माझ्या नवऱ्याला माझे हेअर शॉर्ट असताना आवडायचे. त्यामुळे त्याला मी लग्नाचे माझ्याकडून छोटेसे गिफ्ट दिले आहे. 


पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या लग्नसोहळ्यात मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी नेसली होती. नाकात नथ, हातात हिरवा चुडा, माथ्यावर बाशिंग असा तिचा लूक होता.


तर सिद्धार्थने जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.


लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत होते. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले होते. या फोटोंमधील सिद्धार्थ आणि मितालीच्या केमिस्ट्रीची सगळीकडे चर्चा रंगली होती.

Web Title: Mithali Mayekar gave this gift to Siddharth Chandekar after marriage, she herself revealed