'आरसा आपलं अंतर्मन दाखवत नाही ', रिंकू राजगुरूच्या लेटेस्ट पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 17:53 IST2021-07-12T17:52:41+5:302021-07-12T17:53:39+5:30

रिंकू राजगुरूचा नवा लूक चाहत्यांना खूप भावतो आहे.

'Mirror doesn't show your intuition', Rinku Rajguru's latest post catches everyone's attention | 'आरसा आपलं अंतर्मन दाखवत नाही ', रिंकू राजगुरूच्या लेटेस्ट पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

'आरसा आपलं अंतर्मन दाखवत नाही ', रिंकू राजगुरूच्या लेटेस्ट पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रियता मिळवली. या चित्रपटानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर रिंकू राजगुरूने मराठी सिनेमा आणि हिंदी वेबसीरिजमध्ये काम केले. याशिवाय रिंकू सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत असते. नुकताच तिने नवीन लूक केला आहे आणि ती बऱ्याचदा फोटो शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या फोटो आणि कॅप्शनमधून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 


रिंकू राजगुरू हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हटले की, आरसा आपण कसे दिसतो हे दाखवते, पण आपले अंतर्मन दाखवत नाही.
रिंकू राजगुरू हिने या फोटोत ऑलिव्ह ग्रीन रंगाचे शर्ट घातले आहे. तिचा नवा लूक खूप छान वाटतो आहे. तिच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.


याआधी रिंकूने टू पीसमधील फोटो शेअर करत तिची फिगर फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिचा फिटनेस पाहून चाहते थक्क झाले होते.


रिंकू राजगुरूच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती छूमंतर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

याशिवाय ती हिंदी चित्रपट झुंडमध्येदेखील दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. तर या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती हिंदी वेबसीरिज जस्टिस डिलिव्हर्डमध्येही झळकणार आहे.

Web Title: 'Mirror doesn't show your intuition', Rinku Rajguru's latest post catches everyone's attention