ती सध्या काय करते चित्रपट जिंकत आहे प्रेक्षकांचे मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2017 11:26 IST2017-01-10T11:26:58+5:302017-01-10T11:26:58+5:30
सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी ...
.jpg)
ती सध्या काय करते चित्रपट जिंकत आहे प्रेक्षकांचे मन
स ीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे बॉलिवुडचा तगडा कलाकार आमिर खान याचा दंगल या चित्रपटाने बॉक्सआॅफीसवर कोटीचा गल्ला पार पाडला तर दुसरीकडे ती सध्या काय करते या चित्रपटानेदेखील तीन दिवसांत साडेपाच कोटी रुपयांची कमाई केली आहे. सैराट चित्रपटानंतर ती सध्या काय करते या मराठी चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या तिकीटबारीला पुन्हा चैतन्य आले आहे. कारण नोटाबंदीमुळे चित्रपटसृष्टीवर परिणाम झाला असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे काही आगामी चित्रपटदेखील पुढे ढकलण्यात आले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या व्हेटिंलेटर या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. राजेश मापुसकर दिग्दर्शित हा चित्रपट आहे. तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडची तगडी अभिनेत्री प्रियंका चोप्रानेदेखील मराठी चित्रपटसृष्टीत पदापर्ण केले. तिचे बाबा हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. आता, नव्या वर्षांची सुरुवात करून देणाºया सतीश राजवाडे दिग्दर्शित ती सध्या काय करते या चित्रपटाची प्रदर्शित झाल्यापासून पहिल्या तीन दिवसांत झालेल्या कमाईचा आकडा मात्र तिकीटबारीवर चांगलाच हीट झाला आहे. गेल्या वर्षी नटसम्राट या चित्रपटाने तीन दिवसांत सहा कोटी रुपयांची कमाई केली होती. ती सध्या काय करतेने ही आकडेवारी ओलांडली नसली तरी त्याच वेगाने चित्रपटाची घोडदौड सुरू आहे. या चित्रपटात अभिनय बेर्डे, आर्या आंबेकर, तेजश्री प्रधान, अंकुश चौधरी या कलाकारांचा समावेश आहे.