#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 15:57 IST2018-10-30T15:56:02+5:302018-10-30T15:57:04+5:30

प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला,असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला.

#MeToo: Sai Paranjpye said I have had my #MeToo moments too | #MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा!

#MeToo: एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते, सई परांजपे यांचा धक्कादायक खुलासा!

प्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांनीही ‘मीटू’ मोहिमेला पाठींबा देत, स्वत:ची ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे. लैंगिक गैरवर्तनाचे अनुभव मलाही आलेत. अनेकांनी माझे बळजबरीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. एका माजी केंद्रीय मंत्र्याने तर मला एका रात्रीसाठी विचारणा केली होती, असा धक्कादायक खुलासा सई परांजपे यांनी केला. तथापि या केंद्रीय मंत्र्याच्या नावाचा खुलासा करणे त्यांनी टाळले. ते मंत्री सध्या हयात नाही, केवळ एवढेच त्यांनी सांगितले.
‘मुंबई मिरर’ ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. अलीकडे सई यांच्या ‘सय’ नामक आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मुलाखत दिली. यावेळी ‘मीटू’ मोहिमेबद्दल बोलताना, त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. मी लहानपणीचं लैंगिक गैरवर्तनाचा किळसवाणा अनुभव घेतला. पुण्यात सायकलवरून जात असताना  एका रोडरोमिओने भररस्त्यात माझी छेड काढली होती. पोलिस ठाण्यापर्यंत त्याने माझा पिच्छा पुरवला होता. मला याविरोधात पोलिसात जायचे होते. पण दुसºया सकाळी पोलिसांत तक्रार दाखल न करण्याचा सल्ला मला देण्यात आला होता. 
सिनेसृष्टीतील अनेक पुरूषांची बळजबरीने माझे चुंबन घेण्याचा प्रयत्न केला होता. एका केंद्रीय मंत्र्याने मला एका रात्रीसाठी विचारले होते. कार्यक्रमातून निघाताना या केंद्रीय मंत्र्याने मला घरी सोडून देण्याची इच्छा व्यक्त केली. मी त्याच्यासोबत निघाले. पण यादरम्यान माझ्यासोबत एक रात्र घालवशील का, अशी विचारणा करणारी चिठ्ठी त्यांनी मला दिली. मी त्यांना यासाठी स्पष्ट नकार दिला, असेही सई परांजपे यांनी सांगितले.
‘मीटू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिला आवाज उठवताना दिसत आहेत. पण ही मोहिम केवळ तात्पुरती नसावी. यातून काहीतरी ठोस निष्पण्ण व्हावे, असेही त्या म्हणाल्या.
 

Web Title: #MeToo: Sai Paranjpye said I have had my #MeToo moments too