या मराठी अभिनेत्रीने शेअर केला शेतातला थ्रो बॅक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 10:42 AM2020-04-13T10:42:22+5:302020-04-13T10:52:19+5:30

सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.

Meera sarang share her throwback photo on insta | या मराठी अभिनेत्रीने शेअर केला शेतातला थ्रो बॅक फोटो

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला शेतातला थ्रो बॅक फोटो

googlenewsNext

अभिनेत्री मीरा सारंग सोशल मीडीयावर खूपच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असते. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे अभिनेत्री मीरा सारंग सा-यांचे लक्ष वेधून घेत असते.

 तिच्या इन्स्टाग्रामवरील फोटोंवर एक नजर टाकली तर याफोटोंमधील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे. मीराने इन्स्टाग्रामवर तिचे शेतातले थ्रॉ बॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मीराच्या मागे शेत दिसते आहे. मीराने तिचे जुने फोटो लॉकडाऊनमध्ये शेअर केले आहेत.  चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

मुळाची पुण्याची असलेल्या मीराने जागे मोहन प्यारेमध्ये माधुरी, सोनी मराठीवरील दुनियादारी फिल्मी आणि कर्लस टीव्हीवरील  श्री लक्ष्मी नारायण या मालिकेंमध्ये काम केले आहे. 

Web Title: Meera sarang share her throwback photo on insta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.