मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:00 AM2021-08-21T06:00:00+5:302021-08-21T06:00:00+5:30

अभिनेत्री मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Meera Joshi's 'Vritti' to the audience, find out about it | मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

मीरा जोशीचा 'वृत्ती' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री मीरा जोशीचा वृत्ती चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ साउथ एशियामध्ये आज या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर झाला आहे. या फेस्टिव्हलमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे. हा चित्रपट फक्त २४ तासांसाठी उपलब्ध आहे.

वृत्ती चित्रपटाचे दिग्दर्शन एस. अश्विनने केले आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण उसरणी येथे पार पडले आहे. या चित्रपटाबद्दल मीरा जोशीने सांगितले की, वृत्ती' चित्रपटात मी अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात माझ्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. या चित्रपटात तीन ट्रॅक दाखवण्यात आले आहेत. त्यात लहान मुले, एक विधवा बाई जिला त्या समाजात कमी लेखले जाते. तिसरा ट्रॅक आमचा आहे. ज्यात मी आणि माझ्यासोबत अनुराग वरळीकर मुख्य भूमिकेत आहे. यात पहिल्या किसपर्यंतची जर्नी दाखवण्यात आली आहे. पहिली किस झाल्यानंतर काय घडते, यात दाखवण्यात आले आहे.


तब्बल दोन वर्षानंतर मीरा जोशीने छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका बायको अशी हव्वीमध्ये राखीच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

या मालिकेबद्दल मीरा जोशीने सांगितले की, आतापर्यंत मालिकेत मी निगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. मी डान्सर आहे. मला डान्स करायला खूप आवडतं. आतापर्यंत भूमिका केल्या आहेत तिथे थोडीफार डान्सला वाव मिळाली होती. मात्र या मालिकेत एका पायाने अधू असलेल्या तरूणीची भूमिका साकारताना मी दिसणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही खूप चॅलेंजिंग भूमिका आहे.

Web Title: Meera Joshi's 'Vritti' to the audience, find out about it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.