मीरा जोशी झळकणार 'सपनों की पाठशाला' या हिंदी सिनेमात, दिसणार वेगळ्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 02:19 PM2022-05-26T14:19:24+5:302022-05-26T14:20:01+5:30

Meera Joshi:आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Meera Joshi will be seen in a different role in the Hindi movie 'Sapno Ki Pathshala' | मीरा जोशी झळकणार 'सपनों की पाठशाला' या हिंदी सिनेमात, दिसणार वेगळ्या भूमिकेत

मीरा जोशी झळकणार 'सपनों की पाठशाला' या हिंदी सिनेमात, दिसणार वेगळ्या भूमिकेत

googlenewsNext

आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी (Meera Joshi) लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' चित्रपटानंतर आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे सपनों की पाठशाला - तारा की कहानी (Sapnon Ki Pathshala -Tara Ki Kahani) . या चित्रपटात मीरा जोशी आतापर्यंत न पाहिलेल्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.  हा चित्रपट २९ मे रोजी रात्री ७.५० वाजता डीडी नॅशनलवर प्रसारीत होणार आहे.

भारतीय अणुऊर्जा महामंडळ (NCPIL )च्या महिलांसाठी असणाऱ्या योजनांवर आधारीत सपनों की पाठशाला - तारा की कहानी हा चित्रपट आहे. आपला नवरा गरबीमुळे लोकांचे जुने कपडे घालतो. त्याच्यासाठी नवीन शर्ट घेण्याचे तिचे स्वप्न होते. भारतीय अणुऊर्जा महामंडळ (NCPIL )च्या योजनेतून ती हे स्वप्न कसे पूर्ण करते, हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तारापूरला या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं. 


सपनों की पाठशाला - तारा की कहानी चित्रपटातील भूमिकेबद्दल मीरा जोशी म्हणाली की, पहिल्यांदात गावातल्या एका लग्न झालेल्या निर्मळ आणि मेहनती महिलेची भूमिका साकारली. आतापर्यंत फक्त निगेटिव्ह भूमिका किंवा कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरूणीची भूमिका केल्या होत्या. मात्र नवीन काहीतरी करता आले याचा आनंद आहे. तसेच चित्रपटात एक प्रेरणादायी गाणे आहे जे शूट करताना खूप मजा आली. 


ती पुढे म्हणाली की, गावातल्या बायका ज्या अॅक्टिव्हिटी करतात त्या सगळ्या करायला मजा आली. तिकडच्या लोकांचे राहणीमान आणि तिथल्या बायकांना पाहून काम करायला खूप मजा आली. सुरूवातीच्या सीनमध्ये मला बाहेर अंगणात बसून भांडी घासायची होती. शहरात आपण बेसिनमध्ये उभे राहून भांडी घासतो. तर तिकडे पाटावर बसून भांडी घासताना कधी माझी साडी लोळायची तर कधी भिजायची. तिथल्या एका बाईने मला या सीनच्या शूटिंगदरम्यान मदत केली. त्यातही चित्रपट शिलाई मशीनवर आधारीत असल्यामुळे शिलाई मशीन चालवायला येणे गरजेचे होते. घरी लहानपणापासून मशीन चालवताना पाहिले होते. तिच्याकडून थोडेफार शिवणकामाचे धडे मिळाले होते. त्याचा मला या चित्रपटात उपयोग झाला.


सपनों की पाठशाला ही एक भावनिक कथा आहे. हा सरकाराचा प्रोजेक्ट आहे. सरकार तर्फे महिलांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देणार हा चित्रपट आहे. या चित्रपटातून मला लोकांमध्ये जनजागृती करण्याची संधी मिळाल्यामुळे मी खूप खूश आहे. तसेच प्रेमळ, मेहनती नवऱ्यावर प्रेम करणारी बाई, स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असलेली महिला पहिल्यांदाच साकारली. ही भूमिका साकारताना खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळाल्याचे मीराने सांगितले. 
 

Web Title: Meera Joshi will be seen in a different role in the Hindi movie 'Sapno Ki Pathshala'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.