Medium Spicy ला झणझणीत 'तडका', Leak Video मध्ये दिसली बॉलिवूडमधली मराठी मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2022 11:46 PM2022-06-13T23:46:54+5:302022-06-13T23:48:33+5:30

यावरून या मीडियम स्पायसीला आणखी एक झणझणीत तडका लागणार असल्याची खात्री आहे.

medium spicy marathi movie soon to be released leaked video marathi bollywood actress radhika apte parna pethe lalit prabhakar sai tamhankar | Medium Spicy ला झणझणीत 'तडका', Leak Video मध्ये दिसली बॉलिवूडमधली मराठी मुलगी

Medium Spicy ला झणझणीत 'तडका', Leak Video मध्ये दिसली बॉलिवूडमधली मराठी मुलगी

googlenewsNext

कोरोनाच्या संकटामुळे आणि त्यानंतर सर्वांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे. या बदलेल्या जीवनशैली मध्ये प्रत्येक जण स्वतःला समजून घेण्याबरोबरच नाती जपणे, लग्न-मैत्रीतील गुंतागुंत सोडविणे व नाती निभावणे यातून स्वतःला सावरून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. शहरी जीवनातील मानवी नातेसंबंध, प्रेम आणि विवाह याबद्दल खुसखुशीत भाष्य करणारा ‘मीडियम स्पाइसी’ चित्रपट (Medium Spicy Marathi Movie) येत्या १७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या चित्रपटात सई ताम्हणकर, ललित प्रभाकरपर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांसारख्या दिग्गजांनी अभिनय साकारला आहे. परंतु आता एका लीक व्हिडीओ मात्र लोकमतच्या हाती लागला आहे. यावरून या मीडियम स्पायसीला आणखी एक झणझणीत तडका लागणार असल्याची खात्री आहे. या लीक व्हिडीओमध्ये बॉलिवूडमधली एक मराठमोळी अभिनेत्री दिसत आहे. ही अभिनेत्री म्हणजे बॉलिवूडमधील नावाजलेली अभिनेत्री राधिका आपटे. अद्याप कोणालाही याची माहिती नसून लोकमतनं ही एक्सक्लुसिव्ह माहिती तुमच्या समोर आणली आहे.


या चित्रपटाचं लेखन इरावती कर्णिक यांनी केलं असून याचं दिग्दर्शन मोहित टाकळकर यांनी केलंय. तसंच विधी कासलीवार यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मोठी स्टारकास्ट आणि नाविन्यपूर्ण विषय यामुळे ‘मीडियम स्पाइसी’ बद्दल प्रेक्षकांच्या मनात आता उत्कंठा निर्माण झाली आहे.

Web Title: medium spicy marathi movie soon to be released leaked video marathi bollywood actress radhika apte parna pethe lalit prabhakar sai tamhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.