मराठमोळी देविकाही हॉलिवूडच्या वाटेने

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2016 16:29 IST2016-04-01T23:29:40+5:302016-04-01T16:29:40+5:30

  मराठमोळी देविका ‘दी मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. 

Marathmoli Devika is also on the way to Hollywood | मराठमोळी देविकाही हॉलिवूडच्या वाटेने

मराठमोळी देविकाही हॉलिवूडच्या वाटेने

लिवूडच्या अनेक नायिकांनी हॉलिवूडची वाट धरली असताना मराठी नट्याही यात मागे नाहीत, हेच सिद्ध झालेय. न्यूयॉर्कमध्ये जन्मलेली आणि तिथेच स्थायिक झालेली अभिनेद्धी देविका भिसे हॉलिवूडमधील पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. देविका ‘दी मॅन हू न्यू इन्फिनिटी’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. अंकगणितज्ज्ञ एस. रामानुजन यांच्या चरित्रावर आधारित या बायोपिकमध्ये देव पटेल हा रामानुजन यांची मुख्य भूमिका साकारत आहे. रामानुजन यांची पत्नी जानकी यांची भूमिका देविकाच्या वाट्याला आली आहे. या चित्रपटाचा पहिला ट्रेलर अलीकडेच प्रदर्शित झाला.
वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी गायन आणि अभिनयास सुरुवात केलेली देविका भरतनाट्यम, भारतीय शास्त्रीय संगीत आणि जॅझ या गायनप्रकारातही निपुण आहे.  इंग्रजी, हिंदी, इटालियन, फ्रेन्च या भाषांवर तिचे प्रभूत्व आहे. जानकीच्या भूमिकेसाठी देविकांनी अय्यंगर ब्राह्मणांच्या संस्कृतीचे, श्र्लोकांचा अभ्यास केले. देहबोलीवर मेहनत घेतली. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण चेन्नईत पार पडलेय.


Web Title: Marathmoli Devika is also on the way to Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.