मराठमोळ्या प्रार्थना बेहरेचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, अदांवरुन हटणार नाही तुमची नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2023 16:20 IST2023-01-30T16:19:57+5:302023-01-30T16:20:28+5:30
Prarthana Behere: प्रार्थना बेहरे बोल्ड व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

मराठमोळ्या प्रार्थना बेहरेचा आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ, अदांवरुन हटणार नाही तुमची नजर
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere)च्या नुकतीच 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेत तिने नेहाचे पात्र साकारले होते आणि या पात्राने रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका संपल्यानंतर प्रार्थना सातत्याने चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वी तिने इंस्टाग्रामवर बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, तेही बोल्ड व्हिडीओमुळे. हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.
प्रार्थना बेहरे हिने इंस्टाग्रामवर बोल्ड व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, मन्डे ब्लूज. या व्हिडीओत प्रार्थनाने व्हाईट रंगाचा ट्रान्सपरेंट गाउन परिधान केला आहे. यात ती वेगवेगळ्या अदा दाखवताना दिसत आहे.
तिच्या या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. या व्हिडीओवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, व्हाईट परी. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, अप्सरासारखी दिसते आहेस. तर आणखी एका युजरने लिहिले की, सुपर से भी उपर..
प्रार्थना बेहरे हिने मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तिने पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून करिअरची सुरुवात केली आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. ‘मितवा’, ‘मिस्टर अँड मिस्टर सदाचारी’, ‘कॉफी आणि बरंच काही’ यांसारख्या चित्रपटात तिने काम केले आहे.