सई, सिद्धार्थच्या साथीने मितालीने केला कोंबडी डान्स; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 13:07 IST2023-12-20T13:07:26+5:302023-12-20T13:07:49+5:30

Mitali mayekar:मितालीने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

marathi stars mitali mayekar sai tamhankar and siddharth chandekar kombdi dance video viral on social media | सई, सिद्धार्थच्या साथीने मितालीने केला कोंबडी डान्स; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

सई, सिद्धार्थच्या साथीने मितालीने केला कोंबडी डान्स; व्हिडीओ पाहून पोट धरुन हसाल

सोशल मीडियावर कमालीची अॅक्टीव्ह असलेली अभिनेत्री म्हणजे मिताली मयेकर (mitali mayekar). या अभिनेत्रीला जितकी अभिनयाची आवड आहे तितकीच तिला फिरण्याचीही आवड आहे. त्यामुळे ती कायम नवनवीन ठिकाणं, नवीन देशांमध्ये भटकंती करत असते. विशेष म्हणजे मिताली बऱ्याचदा तिच्याशी निगडीत गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. परंतु, यावेळी तिने इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

मितालीने नुकताच इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत सई ताम्हणकर (sai tamhankar) आणि सिद्धार्थ चांदेकर 9siddharth chandekar) हे दोघंही दिसून येत आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी एक भन्नाट मजेशीर व्हिडीओ केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेक जण हसून हसून वेडेपिसे झाले आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.

दरम्यान, या व्हिडीओमध्ये त्यांनी व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओसोबत कोलाज केला आहे. यात काही कोंबड्या दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मिताली, सई आणि सिद्धार्थ यांनी या कोंबड्यांना फॉलो केलं आहे. इतकंच नाही तर त्यांच्यासारखीच हेअर स्टाइली केली असून त्यांच्याप्रमाणे डान्स करत आहेत. त्यामुळे त्यांचा हा व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ नेटकऱ्यांना भलताच आवडला असून सामान्यांसोबतच सेलिब्रिटींनीही त्याच्यावर भन्नाट कमेंट केल्याचं दिसून येत आहे.

Web Title: marathi stars mitali mayekar sai tamhankar and siddharth chandekar kombdi dance video viral on social media