'या' कारणामुळे मकरंद अनासपुरे आयुषमान खुराणावर झाले फिदा, भेटीनंतर शेअर केली खास पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 14:19 IST2025-11-18T14:16:37+5:302025-11-18T14:19:28+5:30
मकरंद अनासपुरे आणि आयुषमान खुराणाची खास भेट

'या' कारणामुळे मकरंद अनासपुरे आयुषमान खुराणावर झाले फिदा, भेटीनंतर शेअर केली खास पोस्ट!
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज अभिनेते नुकतेच भेटले आणि या भेटीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी आणि कसदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते मकरंद अनासपुरे आणि बॉलिवूडचा लोकप्रिय स्टार आयुषमान खुराणा यांची भेट झाली. या भेटीचा खास फोटो स्वतः मकरंद अनासपुरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मकरंद अनासपुरे यांनी आयुषमान खुराणाच्या कामाचं आणि त्याच्या स्वभावाचं भरभरून कौतुक केले आहे. या भेटीबद्दल त्यांनी एक खास पोस्ट लिहिली. ज्यात ते म्हणाले, "आयुष्मान भवः मला आयुषमान खुराणाला भेटणे खूप आनंददायी होते. त्याची खरी नम्रता त्याच्या उल्लेखनीय प्रतिभेशी जुळते". मकरंद अनासपुरे यांच्या या पोस्टवरून स्पष्ट झालं की, आयुषमान हा पडद्यावर जितका प्रतिभावान आहे, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यातही नम्र आहे. या पोस्टवर अनेक लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत.
आयुषमान खुराणा आणि मकरंद अनासपुरे यांच्यामध्ये एक समान गोष्ट आहे. दोघांचे चित्रपट हे सामाजिक विषयांवर भाष्य करणारे आणि प्रेक्षकांना विचार करण्यास लावणारे असतात. मकरंद अनासपुरे यांचा सहजसुंदर अभिनय आणि अस्सल ग्रामीण टच असलेली कॉमेडी मराठी प्रेक्षकांना खूप आवडते. तर, आयुषमान खुराणा 'ड्रीम गर्ल', 'बधाई हो' सारख्या चित्रपटांमधून सामाजिक विषयावर हलक्या-फुलक्या विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात माहीर आहे. आयुषमानचा अलिकडेच थामा हा चित्रपट प्रदर्शित झालाय. तर मकरंद अनासपुरे 'साडे माडे तीन' (Sade Maade Teen) या मूळ गाजलेल्या मराठी सिनेमाचा सीक्वलमधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.