लग्नानंतर मराठमोळ्या गायिकेच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 15:27 IST2026-02-13T15:26:52+5:302026-02-13T15:27:48+5:30

इन्स्टाग्रामवर  सत्यनारायण पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत.

Marathi Singer Shubhangi Kedar Pranit Wanve Satyanarayan Pooja Photos Wedding | लग्नानंतर मराठमोळ्या गायिकेच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो

लग्नानंतर मराठमोळ्या गायिकेच्या घरी संपन्न झाली सत्यनारायणाची पूजा; शेअर केले फोटो

मराठी संगीत विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायिका शुभांगी केदार नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.  शुभांगीने प्रणित वानवे याच्यासोबत लग्नाची गाठ बांधत आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू केली आहे. सोशल मीडिया आणि यूट्यूबवर आपल्या मधुर आवाजाने राज्य करणाऱ्या शुभांगीच्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. विवाहसोहळ्यानंतर शुभांगीच्या सासरी अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने सत्यनारायणाची पूजा पार पडली.

 शुंभागीने इन्स्टाग्रामवर  सत्यनारायण पूजेचे काही फोटो शेअर केले आहेत. या पूजेसाठी शुंभागीने अतिशय देखणी अशी पिवळ्या रंगाची पारंपरिक साडी परिधान केली होती. गळ्यात मंगळसूत्र, हातात हिरवा चुडा परिधान केलेली शुंभागी सुंदर दिसत होती. तर प्रणितने पांढऱ्या रंगाचा नक्षीकाम केलेला कुर्ता परिधान केला होता. दोघांनी मनोभावे सत्यनारायणाची पूजा संपन्न केल्याचं पाहायला मिळालं.

शुंभागीने हे फोटो शेअर करताना "From Hi to मम" अशी खास रोमँटिक कॅप्शन दिली आहे. या जोडीचे फोटो सध्या सोशल मीडियावर खूपच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी नवदांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. शुभांगीचा पती प्रणित हा एक 'क्रिएटीव्ह कन्सल्टंट' असून त्याने शुभांगीच्या अनेक म्युझिक अल्बम्ससाठी मोलाचे काम केले आहे. शुभांगीची 'गोव्याच्या किनाऱ्यावर', 'इश्काची नौका' आणि 'तुझी फिलिंग' ही गाणी तुफान लोकप्रिय झाली असून, युट्युबवर या गाण्यांना करोडो व्ह्यूज मिळाले आहेत.


Web Title : मराठी गायिका शुभांगी केदार ने शादी के बाद सत्यनारायण पूजा की।

Web Summary : मराठी गायिका शुभांगी केदार ने हाल ही में प्रणित वानवे से शादी की। शादी के बाद शुभांगी के घर पर सत्यनारायण पूजा का आयोजन किया गया। शुभांगी ने इंस्टाग्राम पर तस्वीरें साझा कीं, जिसमें वह पीले रंग की साड़ी में बहुत सुंदर लग रही थीं। दंपति की तस्वीरें वायरल हो रही हैं, और प्रशंसक उन्हें आशीर्वाद दे रहे हैं।

Web Title : Marathi singer Shubhangi Kedar celebrates Satyanarayan Puja after wedding.

Web Summary : Marathi singer Shubhangi Kedar recently married Pranit Wanve. Following the wedding, a traditional Satyanarayan Puja was held at Shubhangi's home. Shubhangi shared photos on Instagram, where she looked stunning in a yellow saree. The couple's photos are viral, with fans showering them with blessings.