दिवाळीच्या मुहुर्तावर लोकप्रिय गायिकेने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2024 11:50 IST2024-10-27T11:48:19+5:302024-10-27T11:50:15+5:30

दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं पसंत करतात. मराठीतील सुप्रसिद्ध गायिका असलेल्या प्रियांका बर्वेने देखील दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे.

marathi singer priyanka barve bought new car on the occassion of diwali 2024 shared photo | दिवाळीच्या मुहुर्तावर लोकप्रिय गायिकेने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केले फोटो

दिवाळीच्या मुहुर्तावर लोकप्रिय गायिकेने घरी आणली नवी कोरी कार, शेअर केले फोटो

राज्यात सर्वत्र दिवाळीचा माहौल आहे. दिवाळीच्या मुहुर्तावर अनेक सेलिब्रिटी घर, गाडी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी करणं पसंत करतात. मराठीतील सुप्रसिद्ध गायिका असलेल्या प्रियांका बर्वेने देखील दिवाळीचा मुहुर्त गाठला आहे. प्रियांकाने दिवाळीच्या मुहुर्तावर नवी कोरी कार घरी आणली आहे. सोशल मीडियावरुन याबाबत प्रियांकाने चाहत्यांना माहिती दिली आहे. 

प्रियांकाने दिवाळीच्या मुहुर्तावर टोयोटा इनोव्हा हायक्रॉस ही गाडी खरेदी केली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. या गाडीची किंमत ३७ लाखांच्या घरात आहे. "दिवाळी सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. आम्ही नवीन कार खरेदी केली आहे. आता पुढच्या प्रवासासाठी उत्सुक आहे", असं कॅप्शन प्रियांकाने दिलं आहे.  


प्रियांका ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायिका आहे. आपल्या सुमधूर गायनाने तिने चाहत्यांना मंत्रमुग्ध केलं आहे. प्रियांका बर्वे नेहमीच वेगवेगळी गाणी प्रेक्षकांसमोर घेऊन आली आहे. तसेच प्रियांकाने अनेक मराठी चित्रपटातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. एक व्हर्सटाइल गायिका अशी ओळख तिने संगीत क्षेत्रात निर्माण केली आहे. 

Web Title: marathi singer priyanka barve bought new car on the occassion of diwali 2024 shared photo