अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला मुग्धाच्या बहिणीचा विवाहसोहळा; रिसेप्शन पार्टीचे फोटो आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 12:03 PM2023-12-12T12:03:39+5:302023-12-12T12:04:40+5:30

Mugdha Vaishampayan: मुग्धाने तिच्या इन्स्टाग्रामवर या लग्नसोहळ्याचे काही फोटो शेअर केले आहेत.

marathi singer Mugdha Vaishampayan sister wedding photos | अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला मुग्धाच्या बहिणीचा विवाहसोहळा; रिसेप्शन पार्टीचे फोटो आले समोर

अत्यंत साध्या पद्धतीने पार पडला मुग्धाच्या बहिणीचा विवाहसोहळा; रिसेप्शन पार्टीचे फोटो आले समोर

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन  (Mugdha Vaishampayan) सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत येत आहे. काही दिवसांपूर्वीच मुग्धा आणि प्रथमेश लघाटे यांनी त्यांच्या प्रेमाची कबुली दिली. त्यामुळे ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. लवकरच मुग्धा आणि प्रथमेश लग्नाच्या बेडीत बांधले जाणार असून नुकतंच तिच्या बहिणीचं लग्न झालं. या लग्नसोहळ्यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मुग्धा आणि प्रथमेश (prathamesh laghate) यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर मुग्धाने तिच्या बहिणीच्या लग्नाची माहिती सुद्धा चाहत्यांना दिले. मुग्धाची बहीण मृदुल वैशंपायन हिच्या केळवणापासून ते लग्नापर्यंत अनेक लहानमोठ्या कार्यक्रमांचे फोटो मुग्धाने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे तिच्या बहिणीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

नुकतीच मृदुलने लग्नगाठ बांधली असून तिच्या रिसेप्शन पार्टीचे फोटो मुग्धाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सोबतच बहिणीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. विशेष म्हणजे मृदुलचं लग्न अत्यंत साधेपणाने आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने झालं. त्यामुळे सध्या नेटकऱ्यांनी त्यांच्या साधेपणाचंही कौतुक केलं आहे.

दरम्यान, मुग्धा आणि तिच्या बहिणीचं फार घट्ट नातं आहे. या दोघींमध्ये उत्तम बॉण्डिंग असून कायम त्यांच्यातील मैत्री, प्रेम यांचा प्रत्यय नेटकऱ्यांना येत असतो. मुग्धा वा मृदुल दोघीही एकमेकींसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
 

Web Title: marathi singer Mugdha Vaishampayan sister wedding photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.