Dharmaveer Box Office Collection : हाऊसफुल्ल! बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’चा कल्ला, 10 दिवसांत कमावले इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 03:31 PM2022-05-25T15:31:50+5:302022-05-25T15:34:26+5:30

Dharmaveer Box Office Collection : गत 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हापासून चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. दहा दिवसांत या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे.

marathi movie Dharmaveer- Mukkam Post Thane Box Office Collection in 10 days | Dharmaveer Box Office Collection : हाऊसफुल्ल! बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’चा कल्ला, 10 दिवसांत कमावले इतके कोटी

Dharmaveer Box Office Collection : हाऊसफुल्ल! बॉक्स ऑफिसवर ‘धर्मवीर’चा कल्ला, 10 दिवसांत कमावले इतके कोटी

googlenewsNext

Dharmaveer Box Office Collection : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे’ ( Dharmaveer- Mukkam Post Thane) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. प्रवीण तरडे दिग्दर्शित या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. गत 13 मे रोजी हा चित्रपट रिलीज झाला. तेव्हापासून चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. दहा दिवसांत या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली आहे.

तब्बल चारशेहुन अधिक चित्रपटगृहे आणि 10 हजारांहून अधिक शोजसह चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 2.5 कोटींची कमाई करत विक्रमी सुरुवात केली होती. यानंतर पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने 13.86 कोटींची कमाई केली होती. आता या सिनेमाने 18 कोटींचा टप्पा पार केला आहे.

गेल्या दहा दिवसांत या चित्रपटात 18.03 कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवसापासून चित्रपटाचे अनेक शो हाऊसफुल्ल आहेत.  अभिनेते व धर्मवीरचे निर्माते मंगेश देसाई यांनी या उदंड प्रेमासाठी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

‘धर्मवीर’ चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक मुख्य भूमिकेत आहे. प्रसाद ओकने या चित्रपटामध्ये आनंद दिघेंची हुबेहुब अशी देहबोली साकारली आहे. त्यांची दाढी, त्यांचा एकूण लूकही प्रसाद ओकने व्यवस्थितरित्या अवलंबला आहे. इतकंच नव्हे तर त्यांची देहबोली, आवाजातील चढउतार देखील प्रसादने चांगल्याप्रकारे स्विकारल्याचं दिसून येतंय. या चित्रपटात एक दमदार पोवाडा असून तो शाहिर नंदेश उमप यांनी संगीतबद्ध केला असून त्यांनीच तो गायला आहे.  

Web Title: marathi movie Dharmaveer- Mukkam Post Thane Box Office Collection in 10 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.