मराठी चित्रपटाचे अरेबिक वळण...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 10:14 IST2016-11-23T10:13:21+5:302016-11-23T10:14:23+5:30

राज चिंचणकर    मराठी चित्रपट एकीकडे इतर भाषेत पोहोचत असतानाच, आता प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'भय' या मराठी चित्रपटाने त्यापलीकडे ...

Marathi film of Arabic film ...! | मराठी चित्रपटाचे अरेबिक वळण...!

मराठी चित्रपटाचे अरेबिक वळण...!

n style="color: rgb(0, 0, 0); font-family: "Ek Mukta", sans-serif; font-size: 18px;">राज चिंचणकर 
 
मराठी चित्रपट एकीकडे इतर भाषेत पोहोचत असतानाच, आता प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या 'भय' या मराठी चित्रपटाने त्यापलीकडे उडी घेतली आहे. हा चित्रपट एकाचवेळी मराठी, तामिळ, तेलगु आणि अरेबिक भाषेत प्रदर्शित होणार आहे. यानिमित्ताने मराठी चित्रपटाने थेट अरेबिक वळण घेतले आहे. अभिजीत खांडकेकर, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, सतीश राजवाडे, सिद्धार्थ बोडके आदी कलावंत या चित्रपटात चमकणार असून, या चित्रपटाची गाणी चक्क दुबई येथे शूट झाली आहेत. तब्बल ४५ डिग्री तपमानात या गाण्यांचे शूटिंग केल्याचे स्मिता गोंदकर याविषयी बोलताना सांगते. ९ डिसेंबर रोजी हा चित्रपट मराठी पडद्यावर येत आहे. 

Web Title: Marathi film of Arabic film ...!