"केदार माझा सख्खा भाऊ आहे, हे मला माहितच नव्हतं...", मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले- "तो लहानपणापासूनच..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:24 IST2026-02-04T17:24:12+5:302026-02-04T17:24:33+5:30

मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. नुकतीच त्यांनी लोकमत फिल्मीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. केदार शिंदेला मी त्याचा भाऊ आहे हे माहितच नव्हतं, असंदेखील ते मुलाखतीत म्हणाले.

marathi director mandar shinde interview said i did not know that he was my brother | "केदार माझा सख्खा भाऊ आहे, हे मला माहितच नव्हतं...", मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले- "तो लहानपणापासूनच..."

"केदार माझा सख्खा भाऊ आहे, हे मला माहितच नव्हतं...", मंदार शिंदेंचा मोठा खुलासा, म्हणाले- "तो लहानपणापासूनच..."

केदार शिंदे हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. अनेक सुपरहिट सिनेमे त्यांनी दिले आहेत. केदार शिंदेंचा भाऊ मंदार शिंदे हे सुद्धा एकेकाळी कलाविश्वात सक्रिय होते. ते उत्तम दिग्दर्शक आहेत. मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असताना मंदार शिंदे यांच्या आयुष्याने वेगळाच टर्न घेतला. त्यांच्या आयुष्यातील काही घटनांमुळे आता ते कलाविश्वात फारसे सक्रिय नाहीत. ड्रायव्हिंग करून कुटुंब चालवायची वेळ त्यांच्यावर आली आहे. नुकतीच त्यांनी लोकमत फिल्मीला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. केदार शिंदेला मी त्याचा भाऊ आहे हे माहितच नव्हतं, असंदेखील ते मुलाखतीत म्हणाले.

मंदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत. ते म्हणाले, "लहानपणापासूनच माझं आजोबांच्या(शाहीर साबळे) घरी जाणं येणं होतं. केदार दादा लहानपणापासून त्यांच्याकडेच राहत होता. मी माझ्या आईच्या घरी काळाचौकीला जन्माला आलो आणि तिथेच वाढलो. आई दररोज मला परेल व्हिलेजमधल्या आजोबांच्या घरी घेऊन जायची. तिथे केदार दादा पण असायचा. आम्ही दोघेही वेगवेगळ्या शाळेत शिकायला होतो. तो आर.एम.भटमध्ये होता तर मी दादारच्या किंग जॉज स्कूलमध्ये शिकलो. आम्हाला जवळजवळ ५-६ वर्ष माहितच नव्हतं की आम्ही सख्खे भाऊ आहोत. कारण त्यांचं वलय वेगळं होतं. मी इकडे वस्तीत राहायचो. ५-७ वर्षांनंतर केदार दादाला माझी आई हिच त्याची आई असल्याचं समजलं. तेव्हा त्याला कळलं की मी त्याचा सख्खा भाऊ आहे. पण आमच्यात कायम अंतर होतं".

मंदार शिंदे यांनी अनेक मालिकांच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमपणे सांभाळली. पण, काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाचा भयानक अपघात झाला. या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. यामुळे त्यांचं आयुष्य पू्र्णपणे बदललं. आता ते एका व्यावसायिकाचा ड्रायव्हर म्हणून काम करतात. 

Web Title : केदार मेरे भाई हैं, मुझे नहीं पता था: मंदार शिंदे का खुलासा।

Web Summary : मंदार शिंदे ने खुलासा किया कि उन्हें सालों तक नहीं पता था कि केदार शिंदे उनके भाई हैं। वे अलग-अलग पले-बढ़े, बाद में उन्हें अपने रिश्ते का पता चला। मंदार, जो कभी निर्देशक थे, अब अपने बेटे के दुर्घटना के बाद पारिवारिक कठिनाइयों के बाद गाड़ी चलाते हैं।

Web Title : Kedar is my brother, I didn't know: Mandar Shinde reveals.

Web Summary : Mandar Shinde revealed he didn't know Kedar Shinde was his brother for years. They grew up separately, only discovering their relationship later. Mandar, once a director, now drives, following family hardships after his son's accident.