मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 13:49 IST2024-08-03T13:49:07+5:302024-08-03T13:49:46+5:30

सई ताम्हणकरच्या नवीन घराला भेट देत केलं कौतुक

Marathi director Kshitij Patwardhan praises Sai Tamhankar shared appreciation post | मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

मराठी दिग्दर्शकाने सई ताम्हणकरचं केलं कौतुक, अभिनेत्रीचं नवीन घर पाहून म्हणाला...

बोल्ड अँड बिन्धास्त अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्येही आता लोकप्रिय आहे. . तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मूळच्या सांगली जिल्ह्यातील सईने कष्ट, मेहनतीच्या जोरावर नाव मिळवलं. गेल्याच वर्षीने तिने मुंबईत आलिशान घर खरेदी केलं. संघर्षाच्या काळात १० ठिकाणी राहिल्यानंतर तिने आपली हक्काची ११ वी जागा घेतली. याला तिने 'द इलेवन्थ प्लेस' असं नावही दिलं. नुकतंच एका मराठी सेलिब्रिटीने सईच्या घरी भेट घेत तिचं भरभरुन कौतुक केलं आहे.

सई ताम्हणकरने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नवं घर घेतलं. तिच्या नवीन घराला भेट देत अनेक सेलिब्रिटींनी तिचं अभिनंदन केलंय. आता नुकतंच लेखक, दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन (Kshitij Patwardhan) याने सईची तिच्या घरी जाऊन भेट घेतली. त्याने सईचं कौतुक करत लिहिलं, "तुझी मेहनत, पॅशन आणि कामातली सततची धगधगती आग यामुळे तू कायम उंचीवर जात राहिलीस आणि आणखी उंच जात राहशील. एवढ्या भारी घरासाठी खूप अभिनंदन. हे घर खूपच सुंदर, शांत आणि डॅझलिंग आहे. अगदी तुझ्यासारखंच. तुझ्या या प्रवासाचा आणि तू गाठलेल्या यशाचा मला अभिमान आहे."

क्षितीज पटवर्धनच्या YZ, क्लासमेट सिनेमात सईने काम केलं आहे. दोघांची अतिशय घट्ट मैत्री आहे जी वेळोवेळी दिसून आली आहे. आताही त्याने सईचं कौतुक करत ही खास पोस्ट शेअर केली आहे. सईनेही त्याचे यावर आभार मानले आहेत.

Web Title: Marathi director Kshitij Patwardhan praises Sai Tamhankar shared appreciation post