'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 01:36 PM2022-06-30T13:36:30+5:302022-06-30T13:37:18+5:30

Jholzhal Movie: मनोरंजनाची आणि विनोदाची मेजवानी 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Marathi Comedian will be seen in 'Jholzhal' movie | 'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी!

'झोलझाल'मधून हास्याची कारंजे घेऊन येतेय विनोदवीरांची मांदियाळी!

googlenewsNext

मनोरंजनाची आणि विनोदाची मेजवानी 'झोलझाल' (Jholzhal Movie) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला चित्रपट 'झोलझाल'मध्ये विनोदवीरांची मंंदियाळी पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १ जुलैला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

अमोल लक्ष्मण कागणे आणि लक्ष्मण एकनाथ कागणे प्रस्तुत 'रोलींगडाईस' असोसिएशन सोबत 'युक्ती इंटरनॅशनल प्रोडक्शन' अंर्तगत 'झोलझाल' चित्रपट भेटीस येत आहे. दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला असून निर्मित निर्माता गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता, संजना जी अग्रवाल यांनी केली असून सहनिर्माते म्हणून रश्मी अग्रवाल आणि विनय अग्रवाल यांनी बाजू सांभाळली असून चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता लिखित आहेत. तर चित्रपटाच्या संगीताची बाजू प्रफुल-स्वप्नील आणि ललित रामचंद्र यांनी उत्तमरित्या पेलली आहे.


'झोलझाल' चित्रपटाचे पोस्टर पाहता चित्रपटात विविधांगी भूमिका साकारलेल्या कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. या चित्रपटात मंगेश देसाई, मनोज जोशी, अजिंक्य देव, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, अमोल कागणे, सयाजी शिंदे, उदय नेने, उदय टिकेकर, प्रीतम कागणे, इशा अग्रवाल, अलिशा फरेर, सुप्रिया कर्णिक, प्रियांका खोलगडे, साईशा पाठक हे कलाकार झळकणार आहेत. 

Web Title: Marathi Comedian will be seen in 'Jholzhal' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.