नवरा असा हवा! अभिनेत्री गौरी नलावडेने सांगितल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 15:08 IST2025-10-04T15:02:05+5:302025-10-04T15:08:03+5:30
अभिनेत्री गौरी नलावडेला हवाय 'असा' जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली...

नवरा असा हवा! अभिनेत्री गौरी नलावडेने सांगितल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा, म्हणाली...
Gauri Nalawade: मराठी सिनेविश्वातील अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री गौरी नलावडे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. विविध मराठी मालिका, चित्रपटांबरोबर गौरी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. सध्या ही अभिनेत्री प्रसाद ओक दिग्दर्शित वडापाव चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दरम्यान,एका मुलाखतीत तिने तिच्या जोडीदाराबद्दल खुलासा केला आहे.
नुकतीच गौरी नलावडेने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिला आयुष्यात नेमका कसा जोडीदार हवाय त्याबद्दल सांगितलं. तेव्हा ती म्हणाली, हो, अर्थात मला लग्न करायचं आहे.पण, योग्य जोडीदार मिळाला पाहिजे. मला जोडीदाराकडून फार बेसिक अपेक्षा आहेत. तो प्रामाणिक हवा आणि कर्तूत्ववान पाहिजे. म्हणजे माझ्या घरामध्ये मी जे पुरुष बघितले आहेत. ते स्वकर्तूत्वाने मोठे झालेले आहेत. त्यामुळे मला कायम अशीच माणसं आवडतात जी स्वत च्या कर्तूत्वावर मोठी झाली आहेत.
गौरी नलावडेने सांगितल्या 'या' अपेक्षा...
त्यानंतर पुढे गौरी म्हणाली, "माणसं चुका करतात किंवा आपण सगळेच चुकतो.पण,मला अप्रामाणिक माणसं आवड नाहीत. त्यांच्या वागण्या-बोलण्यातून सगळं कळतं. माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की माणसाने प्रामाणिक असं गरजेचं आहे.कारण, प्रामाणिक माणूस नेहमी खरं बोलतो तो कधीही खोटं बोलत नाही. त्यामुळे पुढचे सगळे वाद टाळले जातात. माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी खरं बोलण्याने सुटल्या आहेत.मग ती मैत्री असो आई असेल किंवा कामाचं ठिकाणं असो... मी सिनेमा नाकारताना कधीच कोणाला खोटी कारणं दिली नाहीत. त्यामुळे तो प्रामाणिक असेल तर तो खरा असेल. तरच आमचं पटेल, असं मला वाटतं." अशा भावना अभिनेत्रीने मुलाखतीमध्ये व्यक्त केल्या.
दरम्यान, प्रसाद ओक दिग्दर्शित 'वडापाव' चित्रपटात गौरी नलावडेने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. २ ॲाक्टोबर रोजी हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 'वडापाव' या चित्रपटात प्रसाद ओक, अभिनय बेर्डे, सविता प्रभुणे, रसिका वेंगुर्लेकर, शाल्व किंजवडेकर, रितिका श्रोत्री, समीर शिरवाडकर, सिद्धार्थ साळवी, अश्विनी देवळे-किन्हीकर यांच्याही भूमिका आहेत.