VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 11:44 IST2025-05-09T11:42:45+5:302025-05-09T11:44:22+5:30
"आज त्या १२५ रुपयांची आठवण झाली...; संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना, म्हणाला...

VIDEO: "तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की...", संतोष जुवेकरने व्यक्त केल्या आईविषयी भावना
Santosh Juvekar:मराठी अभिनेतासंतोष जुवेकर (Santosh Juvekar) अलिकडेच 'छावा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत होता. या चित्रपटामुळे त्याला सर्वत्र वाहवाही मिळाली. छावामधील त्याच्या भूमिकेने आणि लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता संतोष जुवेकरनेसोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे त्याची चर्चा होत आहे. आपल्या आई विषयी मनातल्या भावना व्यक्त करणारी सुंदर पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे. अलिकेडेच अभिनेत्याला एका पुरस्काराने गौरविण्यात आलं, त्यांचं सगळं श्रेय त्याने आपल्या आईला दिलं आहे. सध्या संतोष जुवेकरची ही पोस्ट पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.
आई या दोन अक्षरी शब्दामध्ये वात्सल्य, प्रेम आणि आपुलकी दडलेली असते. आई जवळ असणं त्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. नुकताच सोशल मीडियावर संतोष जुवेकरने त्याच्या आईसोबतचा सुंदर असा फोटो पोस्ट केलाय. या पोस्टद्वारे त्याने आईविषयी प्रेम व्यक्त करत लिहिलंय की, आज खूप काळानंतर मी माझी कमाई आणून आईच्या हातात दिली. आज त्या १२५ रुपयांची आठवण झाली, माझ्या पहिल्या कमाईची. तेंव्हा असेच २५ माझ्या मेहनतीचे मी स्वतःवर खर्च केले होते आणि १०० तिच्या हातात दिले होते. ती जाम खुश आहे आणि मी तसाच तिला खुश करण्याच्या स्वप्नात. तिच्या मांडीवर झोपून स्वप्नं पाहिली की कायम खरी होतात. अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर त्याच्या चाहत्यांसह अनेक कलाकार मंडळींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
वर्कफ्रंट
दरम्यान, संतोष जुवेकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर झेंडा, रेगे, मोरया, रानटी, एक तारा, अस्सं सासर सुरेख बाई, वादळवाट, या गोजिरवाण्या घरात अशा चित्रपट व मालिकांमधून काम करत त्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.