"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:34 IST2025-05-07T16:32:53+5:302025-05-07T16:34:46+5:30
"शूटिंगदरम्यान अंगठा तुटला अन्...", पुष्कर जोगने सांगितला थरारक प्रसंग, असं काय घडलेलं?

"चित्रपटामध्ये स्टंट करताना अंगठा तुटला", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो' भयानक प्रसंग; म्हणाला- "दुर्दैवाने..."
Pushkar Jog : मराठी अभिनेतापुष्कर जोग हा त्याच्या जबरदस्त चित्रपटामुळे चांगलाच प्रसिद्धीझोतात आला होता. २००७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांमध्ये पाहायला मिळते. महेश कोठारे दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पुष्कर जोग अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स पाहायला मिळाला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पुष्कर जोगने 'जबरदस्त' या चित्रपटाच्या शूटिंगचा चित्तथरारक प्रसंग सांगितला आहे.
नुकतीच पुष्कर जोगने 'लोकशाही फ्रेंडली'ला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान त्याने जबरदस्त चित्रपटाच्या शूटिंगचा किस्सा शेअर केला. त्यावेळी अभिनेता म्हणाला,"या चित्रपटामध्ये काम करताना असा किस्सा घडला होता की स्टंट करताना माझा अंगठा तुटला होता. याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही. माझा अंगठा अजूनही तसाच आहे. त्यावर शस्त्रक्रिया केलेली आहे. पण, अजूनही मला हा अंगठा वाकवता येत नाही. चित्रपटामध्ये एक स्टंट होता तो मेट्रिक्स या चित्रपटातील स्टंटप्रमाणे करण्याचा माझा प्रयत्न चालू होता."
त्यानंतर पुढे अभिनेता म्हणाला, "तेव्हा मला महेश सर म्हणाले की, तू हा स्टंट करशील का? त्यावेळी जोशात मी त्यांना म्हणालो, 'सर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन'. तेव्हा तो स्टंट मी केला. दुर्दैवाने, तो स्टंट चित्रपटात नाही आहे, कारण तेव्हा माझा अपघात झाला होता. तेव्हा स्टंटवेळी मी झाडावर फेकलो गेलो. केबल स्टंट करायचे होते. त्यादरम्यान, माझं तोंड झाडावर आपटेल या भीतीने मी हातमध्ये आणला. त्याच्यामध्ये माझ्या हाताचा अंगठा तुटला." अशा चित्तथरारक प्रसंगाबद्दल पुष्कर जोगने मुलाखतीमध्ये खुलासा केला.