"जन्म झाला तेव्हा मला मृत घोषित केलं अन्...", मृत्यूच्या दाढेतून परतला अभिनेता, काय घडलेलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:02 IST2026-02-11T17:01:22+5:302026-02-11T17:02:56+5:30

"जन्मताच डॉक्टरांनी मृत घोषित केलेलं...", मराठी अभिनेत्याने सांगितला 'तो'प्रसंग, म्हणाला- "माझ्या मेंदूला…"

marathi cinema actor dashavatar movie fame siddharth menon talks about complications during her birth | "जन्म झाला तेव्हा मला मृत घोषित केलं अन्...", मृत्यूच्या दाढेतून परतला अभिनेता, काय घडलेलं?

"जन्म झाला तेव्हा मला मृत घोषित केलं अन्...", मृत्यूच्या दाढेतून परतला अभिनेता, काय घडलेलं?

Siddharth Menon: २०२५ मधील सुबोध खानोलकर दिग्दर्शित दशावतार हा सिनेमा चांगलाच गाजला. दिलीप प्रभावळकरांसह या चित्रपटात अभिनेते महेश मांजरेकर, प्रियदर्शिनी इंदलकर, अभिनय बेर्डे तसेच सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट होती. दरम्यान, या सिनेमात बाबुली मेस्त्रीच्या मुलाची भूमिका साकारून अभिनेता अभिनेता सिद्धार्थ मेनन चांगलाच  प्रसिद्धीझोतात आला. चित्रपटातील त्याच्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. सध्या हा अभिनेता एका मुलाखतीमुळे चर्चेत आला. या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या जन्माच्यावेळी घडलेला प्रसंग शेअर केला आहे. 

नुकतीच सिद्धार्थ मेननने लोकशाही फ्रेंडलीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या जन्माचा एक प्रसंग शेअर केला आहे.  अभिनेत्याचा जन्म होताच त्याला मृत घोषित करण्यात आलेलं, असं त्याने या मुलाखतीमध्ये सांगितलं. तो प्रसंग सांगताना सिद्धार्थ म्हणाला,"मी जेव्हा जन्माला येत होतो, तेव्हा काही अडचणी आल्या. माझ्या गळ्याकडे नाळ फिरलेली आणि मला त्रास होत होता.तेव्हा साधारण एक दीड ते दोन मिनिटं माझ्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. हे खूप हानिकारक असतं. कारण, पुढे एका बाळासाठी त्यामुळे अनेक अडचणी होऊ शकतात.पण, हे सगळं झाल्यानंतर माझ्याबाबतीत तसं काहीच घडलं नाही."

मग पुढे सिद्धार्थ म्हणाला," त्यामुळे मी दर वाढदिवसाला मी म्हणतो की आपला जन्म असा आहे, त्यावेळी डॉक्टरांनी मला मृत घोषित केलेलं,तिथून मी परत आलो. त्यामुळे आता मी कितीही खाली गेलो तर मी वर येऊच शकतो." असा खुलासा अभिनेत्याने केला. 

सिद्धार्थ मेनच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्याने आजवर अनेक सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याने पोश्टर गर्ल, एकुलती एक,पोपट, जून यांसारख्या अभिनय केला आहे.  इतकंच नाहीतर सिद्धार्थ मेननने काही हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. 

Web Title : अभिनेता सिद्धार्थ मेनन को जन्म पर मृत घोषित किया, साझा किया अनुभव।

Web Summary : 'दशावतार' से प्रसिद्ध सिद्धार्थ मेनन ने खुलासा किया कि जन्म के समय जटिलताओं के कारण उन्हें मृत घोषित कर दिया गया था। वह बच गए, और इस अनुभव को अपनी दृढ़ता का श्रेय दिया। मेनन ने 'पोस्टर गर्ल' और 'जून' सहित कई फिल्मों में अभिनय किया है।

Web Title : Actor Siddharth Menon declared dead at birth, shares near-death experience.

Web Summary : Siddharth Menon, famed for 'Dashavatar', revealed he was declared dead at birth due to complications. He survived, attributing his resilience to this experience. Menon has starred in several films including 'Poster Girl' and 'June'.