मराठी कलाकारदेखील झाले झिंगाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 09:51 IST2016-04-26T04:21:08+5:302016-04-26T09:51:08+5:30

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने तर संपूर्ण महाराष्ट्रात कल्ला केला आहे. त्यातील सर्व गाण्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना येड लावून ठेवलं आहे. चित्रपटाप्रमाणेच गाण्यांची देखील तितकीच चर्चा आहे. या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने महाराष्ट्रील प्रत्येक प्रेक्षकाला झिंग चढली आहे. तर यामध्ये मराठी कलाकारदेखील कसे मागे राहतील.

Marathi cast also became zintat | मराठी कलाकारदेखील झाले झिंगाट

मराठी कलाकारदेखील झाले झिंगाट

गराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाने तर संपूर्ण महाराष्ट्रात कल्ला केला आहे. त्यातील सर्व गाण्यांनी मराठी रसिक प्रेक्षकांना येड लावून ठेवलं आहे. चित्रपटाप्रमाणेच गाण्यांची देखील तितकीच चर्चा आहे. या चित्रपटातील झिंगाट या गाण्याने महाराष्ट्रील प्रत्येक प्रेक्षकाला झिंग चढली आहे. तर यामध्ये मराठी कलाकारदेखील कसे मागे राहतील. नुकताच झी स्टुडिओने एक व्हिडिओ फेसबुक पेजवर पोस्ट केला असून, यामध्ये सर्वच मराठी कलाकारांना झिंग चढलेली दिसते. या कलाकारांनी झिंगाट गाण्यांवर अफलातून डान्स केला आहे. प्रिया मराठे, उमेश कामत, जितेंद्र जोशी,कुशल बद्रीके, अभिजीत खांडकेकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, संतोष जुवेकर  असे अनेक कलाकार झिंगाट या गाण्यावर ठेका धरताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ पाहता असेच म्हणावे लागेल की, प्रेक्षकांप्रमाणेच मराठी इंडस्ट्रीदेखील सैराट झालेली दिसते.


Web Title: Marathi cast also became zintat