मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 07:00 AM2020-04-24T07:00:00+5:302020-04-24T07:00:00+5:30

वैदेहीचा हा फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल

Marathi Actress Vaidehi Parshurami's doll look, photo shared on instagram | मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो

मराठमोळ्या वैदही परशुरामीच्या ग्लॅमरस डॉल लूकची होतेय चर्चा, पहा फोटो

googlenewsNext

सोशल मीडियाच्या माध्यमातून वैदही परशुरामी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. वैदेहीने नुकताच ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, छान तयार होणे खूप मिस करत आहे.


डॉ. काशीनाथ घाणेकर चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.


रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती.

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते.

Web Title: Marathi Actress Vaidehi Parshurami's doll look, photo shared on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.