या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 12:20 IST2020-05-07T11:30:39+5:302020-05-07T12:20:17+5:30

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा तिच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत.

Marathi actress vaidehi parshurami shared a glamorous photo gda | या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस

या मराठी अभिनेत्री शेअर केला ग्लॅमरस फोटो, फॅन्स म्हणाले- गॉर्जिअस

वैदही परशुरामीने आपल्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. तिच्या फोटो आणि व्हिडीओना फॅन्स भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स देत असतात. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदहीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.

वैदहीने तिचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत वैदही खूपच सुंदर दिसते आहे. वैदहीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी देखील लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

डॉ. काशीनाथ घाणेकर' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने प्रेक्षकांना भुरळ पाडली. तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते. रणवीर सिंग अभिनीत आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित सिम्बा सिनेमात ती दिसली होती. बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' सिनेमातही झळकली होती.

Web Title: Marathi actress vaidehi parshurami shared a glamorous photo gda