'लेकीला ऑस्कर मिळावं' सुकन्या मोनेंच्या 90 वर्षीय आईची इच्छा, म्हणाल्या, 'माझं कौतुक...'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 03:28 PM2023-12-18T15:28:52+5:302023-12-18T15:54:22+5:30

'बाईपण भारी देवा'च्या स्पेशल स्क्रीनिंगला सुकन्या मोनेंच्या आईनेही हजेरी लावली

marathi actress Sukanya Mone reveals her 90 years old mother want sukanya to win oscar | 'लेकीला ऑस्कर मिळावं' सुकन्या मोनेंच्या 90 वर्षीय आईची इच्छा, म्हणाल्या, 'माझं कौतुक...'

'लेकीला ऑस्कर मिळावं' सुकन्या मोनेंच्या 90 वर्षीय आईची इच्छा, म्हणाल्या, 'माझं कौतुक...'

मराठी अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) यांनी नुकतीच 'बाईपण भारी देवा' सिनेमाच्या सर्व कलाकारांसह हजेरी लावली. चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर संपूर्ण टीमने एकत्र येत धमाल सेलिब्रेशन केलं. यावेळी सुकन्या मोने यांच्या ९० वर्षीय आई देखील आल्या होत्या. सर्वांच्या नजरा त्यांच्या आईवर खिळल्या होत्या कारण याही वयात त्या लेकीचं कौतुक पाहण्यासाठी हजर होत्या. यावेळी सुकन्या मोनेंनी त्यांच्या आईची काय इच्छा आहे हे देखील सांगितलं.

'बाईपण भारी देवा'च्या स्पेशल स्क्रीनिंगला सुकन्या मोनेंनी स्टेजवर येत आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्या म्हणाल्या,'मला सांगायला खूप आनंद होतोय वैयक्तिक आहे पण तुम्हाला सांगावंसं वाटतंय की हे जे मला यश मिळालं आहे, इतकं प्रेम मिळालं आहे सगळीकडे चित्रपटाचा बोलबाला आहे हे आज माझी ९० वर्षांची आई स्वत:च्या डोळ्यांनी पाहत आहे. तिची इच्छा आहे की मला ऑस्कर मिळावं. म्हणलं कसं शक्य आहे. पण हेच ऑस्कर आहे असं मी तिला सांगू इच्छिते.आज ती इथे उपस्थित आहे याचाच मला खूप आनंद होत आहे.'

सुकन्या मोने गेल्या अनेक वर्षांपासून मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. नाटक, मालिका आणि सिनेमा अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी उत्तम काम करत प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. हे सर्व शक्य झालं ते त्यांच्या आईच्या पाठिंब्यामुळेच. आज त्यांची ९० वर्षांची आई जेव्हा लेकीचं कौतुक पाहत आहे तेव्हा त्यांना किती आनंद होत असणार हे शब्दात सांगता येणारच नाही.

Web Title: marathi actress Sukanya Mone reveals her 90 years old mother want sukanya to win oscar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.