स्पृहा जोशीचा हा नवा लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिच्या नव्या लूकमधील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 07:15 IST2019-07-08T07:15:00+5:302019-07-08T07:15:02+5:30

स्पृहाने तिच्या फेसबुक पेजवर तिचा स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केला असून या फोटोत स्पृहाची नवीन हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे.

Marathi Actress Spruha Joshi New look | स्पृहा जोशीचा हा नवा लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिच्या नव्या लूकमधील फोटो

स्पृहा जोशीचा हा नवा लूक पाहून पडाल तिच्या प्रेमात, पाहा तिच्या नव्या लूकमधील फोटो

ठळक मुद्देया फोटोत तू खूप छान दिसत आहेस, तुझा नवा लूक खूपच छान आहे असे स्पृहाचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी आणि प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक म्हणजे स्पृहा जोशी. आपल्या अभिनयाने स्पृहाने रसिकांची मनं जिंकली आहेत. विविध चित्रपटातील भूमिकांमधून स्पृहाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. याशिवाय छोट्या पडद्यावरही मालिकांमधून तिने तिच्या अभिनयाची जादू पसरवली आहे. स्पृहा सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले फोटो आणि कविता तसंच विचार शेअर करत असते. नुकताच स्पृहाने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

स्पृहाने तिच्या फेसबुक पेजवर तिचा स्टायलिश अंदाजातील फोटो शेअर केला असून या फोटोत स्पृहाची नवीन हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे. स्पृहाने तिचे केस मानेपर्यंत शॉर्ट केले आहेत. माझा हा नवा लूक तुम्हाला कसा वाटतोय हे तिने कॅप्शनद्वारे तिच्या चाहत्यांना विचारले आहे. स्पृहाच्या या फोटोला तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिसाद दिला असून हा फोटो हजारोच्या संख्येने लोकांनी लाईक केला असून अनेकांनी या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोत तू खूप छान दिसत आहेस, तुझा नवा लूक खूपच छान आहे असे तिचे चाहते तिला कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत. 

स्पृहा अभिनयासोबतच एक चांगली लेखिका आणि उत्तम कवियत्री आहे. छोट्या पडद्यावरील बच्चे कंपनीच्या रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करून तिने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची मने जिंकली आहेत. अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, एका लग्नाची तिसरी गोष्ट, उंच माझा झोका यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली. या सगळ्याच मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या. या मालिकेतील तिच्या भूमिकांची नाव देखील आजही लोकांच्या चांगलीच लक्षात आहेत.

तसेच समुद्र, डोण्ट वरी बी हॅपी यांसारख्या नाटकातून तिने तिची अभिनयक्षमता दाखवून दिली. पैसा पैसा, मोरया, जाऊ द्या ना बाळासाहेब, बायोस्कोप, अ पेइंग गेस्ट यांसारख्या चित्रपटातील तिच्या भूमिका गाजल्या. मराठी चित्रपटात आपली एक ओळख बनवल्यानंतर स्पृहा दाक्षिणात्य सिनेमांमध्ये देखील आपले भाग्य आजमावणार आहे.

Web Title: Marathi Actress Spruha Joshi New look