इतक्या वर्षांत इतकी बदलली ही मराठी अभिनेत्री; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 15:37 IST2020-02-22T15:35:15+5:302020-02-22T15:37:53+5:30

या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. सोनालीने नुकताच तिचा करिअरच्या सुरूवातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Marathi Actress Sonali Kulkarni Has changed so much over the years; See her old photos !! | इतक्या वर्षांत इतकी बदलली ही मराठी अभिनेत्री; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

इतक्या वर्षांत इतकी बदलली ही मराठी अभिनेत्री; जुने फोटो पाहून बसणार नाही विश्वास!!

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत  वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनबाबत नेहमीच जास्त सजग असते. 


सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. 'दिल चाहता है' हा चित्रपट सोनालीच्या करियरचा टर्निंग पॉईंट ठरला. या चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. सोनालीने नुकताच तिचा करिअरच्या सुरूवातीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात सोनालीच्या अदा पाहून तुम्हीही फिदा झाल्याशिवाय राहणार नाही. 


करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर तिच्या लूकमध्ये काळाप्रमाणे थोडाफार बदल  झाला असला तरीही आजही सोनाली पूर्वीप्रमाणेच सुंदर आणि फिट दिसते. गेल्या अनेक वर्षांपासून सोनाली सिनेसृष्टीत काम करते आहे. मात्र तिच्याकडे पाहून कुणालाही वाटणार नाही की तिने वयाची चाळीशी गाठली आहे. चाळीशीत असलेली सोनालीने उत्तम फिगर मेंटेन केली आहे. आजही सोनाली फारच ग्लॅमरस दिसते.  

Web Title: Marathi Actress Sonali Kulkarni Has changed so much over the years; See her old photos !!