Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तिचं झालं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 10:17 IST2022-08-22T10:14:58+5:302022-08-22T10:17:44+5:30

Sonalee Kulkarni : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. सोनालीने लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर केले होते. अशातच आता सोनालीनं एक दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

marathi actress Sonalee Kulkarni grandmother passed away | Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तिचं झालं निधन

Sonalee Kulkarni : सोनाली कुलकर्णीवर कोसळला दु:खाचा डोंगर, सर्वात जवळच्या व्यक्तिचं झालं निधन

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni)सध्या तिच्या लग्नसोहळ्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच तमाम चाहत्यांनी तिचा लंडनमधील शाही लग्नसोहळा अनुभवला. प्लॅनेट मराठी ओटीटीवर तिच्या लग्नसोहळ्याचं प्रसारण झालं. सोनालीनेही या लग्नसोहळ्याचे अनेक व्हिडीओ, फोटो शेअर केले होते. अशातच आता सोनालीनं एक दु:खद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. होय, सोनालीच्या आजीचं नुकतंच निधन झालं.
 सोनाली कुलकर्णीची आजी सुशीला कुलकर्णी यांची प्राणज्योत मालवली. रविवारी ही दु:खद बातमी समोर आली. सोनालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आजीसोबतचा एक खास व्हिडीओ शेअर करत, ही बातमी सांगितली. आजी, तू आमच्यात असशील... आम्ही असेपर्यंत, असं कॅप्शन देत सोनालीनं व्हिडीओ पोस्ट केला आहे.

या व्हिडीओ सोनाली आजीसोबत डान्स करताना दिसतेय. आजीसोबतचा बालपणीचा एक सुंदर फोटोही या व्हिडीओत पाहायला मिळतो. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. सोनालीच्या दु:खात तिचे चाहतेही सहभागी झाले आहेत.

सोनालीने 2021 साली कुणाल बेनोडेकरसोबत लग्नगाठ बांधली होती. दोघांनी लॉकडाऊन काळात दुबईत रजिस्टर मॅरेज केलं होतं. ते सुद्धा अगदी साध्या पद्धतीने. या लग्नात अगदी सोनालीचे कुटुंबीय सामील होऊ शकले नव्हते. शिवाय लग्नाची हौसमौजही करता आली नव्हती. त्यामुळे यावर्षी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सोनाली व कुणाल यांनी लंडनमध्ये पुन्हा एकदा विधिवत शाही लग्न केलं होतं. 

Web Title: marathi actress Sonalee Kulkarni grandmother passed away