अभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 11:04 IST2019-01-19T11:01:42+5:302019-01-19T11:04:40+5:30
मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित होती.

अभिनेत्री स्मिता तांबेचं पार पडलं शुभमंगल, या कलाकारासह अडकली रेशीमगाठीत
गेलं वर्ष लग्नाचं वर्षे होतं असं म्हटल्यास वावगं ठरू नये. कारण गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकले. आपल्या जोडीदारासह अनेकांनी जीवनाची नवी इनिंग सुरू केली. नववर्षाची म्हणजेच २०१९ची सुरूवातसुद्धा सनई चौघडेनं झाली आहे. आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री स्मिता तांबे ही आता लग्नबंधनात अडकली आहे. नाट्य कलाकार विरेंद्र द्विवेदीसह स्मिताचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. हे लग्न दोन पद्धतीने पार पडलं. मराठमोळ्या आणि उत्तर भारतीय पारंपरिक पद्धतीने हे शुभमंगल पार पडलं. यावेळी नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी स्मिताची खास मैत्रीण अभिनेत्री रेशम टिपणीस आवर्जून उपस्थित होती.
आपल्या मैत्रिणीला नववधूच्या रुपात पाहून रेशमच्या आनंदाला पारावार राहिला नाही. “दोघं रेशीमगाठीत अडकल्याचे पाहून अत्यंत आनंद झाला. हे दोघं एकमेकांच्या प्रेमात अडकले आणि आता जे आपल्या जीवनाचा नवा अध्याय सुरू करतात हे पाहून खूप छान वाटत आहे” अशी प्रतिक्रिया रेशमने दिली आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. जोगवा, ७२-माईल्स, परतु, देऊळ यासह विविध मराठी सिनेमात तसंच सिंघम रिटर्न्स, रुख अशा बॉलीवुडच्या सिनेमातही स्मिताने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.