मराठमोळ्या अभिनेत्रीचे 'जमाल कुडू'वर ठुमके, डान्स करताना डोक्यावरुन काचेचा ग्लास पडला अन्...; पाहा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 12:55 IST2024-04-08T12:53:41+5:302024-04-08T12:55:21+5:30

डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून 'जमाल कुडू'वर डान्स करत होती अभिनेत्री, नाचतानाच ग्लास पडला अन्...

marathi actress smita tambe dance on jamal kudu song video goes viral | मराठमोळ्या अभिनेत्रीचे 'जमाल कुडू'वर ठुमके, डान्स करताना डोक्यावरुन काचेचा ग्लास पडला अन्...; पाहा व्हिडिओ

मराठमोळ्या अभिनेत्रीचे 'जमाल कुडू'वर ठुमके, डान्स करताना डोक्यावरुन काचेचा ग्लास पडला अन्...; पाहा व्हिडिओ

रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेला 'अॅनिमल' हा सिनेमा प्रचंड गाजला. डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. रणबीरबरोबरच या सिनेमातील बॉबी देओलच्या भूमिकेचंही कौतुक झालं. या सिनेमातील त्याच्या एन्ट्रीचं जमाल कुडू हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. डोक्यावर दारूचा ग्लास ठेवून बॉबी देओल या गाण्यावर डान्स करताना दिसत होता. बॉबी देओलच्या या हिट गाण्यावर डान्स करण्याचा मोह अनेक कलाकारांना आवरता आलेला नव्हता. या गाण्यावरचे अनेक रील व्हिडिओ व्हायरल झाले होते. 

आता मराठमोळी अभिनेत्री स्मिता तांबेने जमाल कुडूवर डान्स केला आहे. गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात स्मिता तांबेनेही हजेरी लावली होती. या कार्यक्रमासाठी स्मिताने खास काळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर केसांचा बन बांधून गुलाबाचं फुलंही माळलं होतं. गुढीपाडव्याच्या या कार्यक्रमातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

या व्हिडिओत स्मिता डोक्यावर काचेचा ग्लास ठेवून जमाल कुडू गाण्यावर डान्स करण्यात दिसत आहे. तिच्या बाजूला अभिनेता सुशांत शेलार आणि इतर मराठी कलाकारही दिसत आहेत. डोक्यावर ग्लास ठेवून स्मिता अगदी तालात डान्स करत आहे. पण, नंतर डान्स करत असतानाच तिच्या डोक्यावरुन ग्लास पडतो. तिचा हा व्हिडिओ मराठी स्क्रीन या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.  

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये स्मिताने काम केलं आहे. '७२ मैल एक प्रवास' हा तिचा सिनेमा खूप गाजला. 'जोगवा', 'तुकाराम', 'बायोस्कोप' या मराठी सिनेमांबरोबरच काही हिंदी सिनेमांतही ती झळकली. 'जोरम' या मनोज वाजपेयीच्या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत होती. 

Web Title: marathi actress smita tambe dance on jamal kudu song video goes viral