मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, लग्नानंतर चार वर्षांनी दिला गोंडस मुलाला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:17 IST2026-02-24T16:16:18+5:302026-02-24T16:17:20+5:30
एका गाण्यामुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री, आजही त्या गाण्यामुळेच मिळते ओळख

मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, लग्नानंतर चार वर्षांनी दिला गोंडस मुलाला जन्म
गेल्या काही दिवसात मराठी कलाविश्वात अनेकांनी नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. कोणी जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली तर कोणी थेट लग्नबंधनात अडकलं. तर दुसरीकडे एका मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला आहे. लग्नानंतर चार वर्षींनी ती आई झाली आहे. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. कोण आहे ही अभिनेत्री?
तर ही आहे 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यामुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री सिद्धी पाटणे. सिद्धीच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. तिने काल एका गोंडस मुलाला जन्म दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली.

सिद्धी पाटणेच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, तिने २०२१ मध्ये विशाल दलालसोबत लग्नगाठ बांधली. विशाल आर्किटेक्ट आहे. लग्नानंतर काही काळ अभिनयापासून लांब राहून सिद्धी आपल्या वैयक्तिक आयुष्याचा आनंद घेत होती. मधल्या काळात तिने एका मराठी सिनेमात काम केलं. तर आता मुलाच्या जन्मानंतर तिच्या आयुष्यात एक नवीन आणि आनंदी पर्व सुरू झालं आहे.
सिद्धी पाटणेने 'गोव्याच्या किनाऱ्यावर' या गाण्यातून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. या गाण्यातून सिद्धी पाटणे हिने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. सुहृद वर्डेकर आणि सिद्धी पाटणे यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले होते. 'गोव्याच्या किनाऱ्यावर' नंतर तिने इतरही काही म्युझिक अल्बम्स आणि मराठी गाण्यांमध्ये काम केले आहे. सिद्धीने मालिका आणि चित्रपटातूनही काम केले आहे. प्रेमा तुझा रंग कसा, विठू माऊली, श्री गुरुदेवदत्त, सांग तू आहेस का अशा वेगवेगळ्या मालिकांमधून तिने अभिनय साकारला आहे. श्री गुरुदेव दत्त या मालिकेत सिद्धीला पार्वतीची आव्हानात्मक भूमिका तिने साकारली होती. ‘ सांग तू आहेस का’ या स्टार प्रवाहवरील मालिकेतून ती शांभवीच्या भूमिकेत झळकली. शिवाय मधल्या काळात काही ज्वेलरीसाठी तिने मॉडेलिंग देखील केले आहे. २०२३ साली ती 'मराठी पाऊल पडते पुढे' सिनेमात दिसली होती. गेल्या वर्षी तिचा 'पुन्हा एकदा चौरंग' सिनेमा आला होता.