'झिम्मा 2' च्या यशानंतर शिवानी सुर्वेची लगीनघाई? व्हिडिओ शेअर करत दिली हिंट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 01:19 PM2023-12-20T13:19:54+5:302023-12-20T13:20:59+5:30

बॉयफ्रेंड अजिंक्य ननावरेनेही केली कमेंट

marathi actress Shivani Surve getting married in 2024 gave hint through latest video | 'झिम्मा 2' च्या यशानंतर शिवानी सुर्वेची लगीनघाई? व्हिडिओ शेअर करत दिली हिंट

'झिम्मा 2' च्या यशानंतर शिवानी सुर्वेची लगीनघाई? व्हिडिओ शेअर करत दिली हिंट

'वाळवी' आणि 'झिम्मा 2' असे बॅक टू बॅक हिट सिनेमे देणारी मराठी अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve) सध्या चर्चेत आहे. हिंदी मालिकांमध्ये काम केल्यानंतर शिवानी मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलेच आहे. शिवाय शिवानीची बॉयफ्रेंड अभिनेता अजिंक्य ननवरेसोबत (Ajinkya Nanaware) नेहमीच चर्चा रंगली असते. येत्या वर्षात 2024 मध्ये शिवानी लग्न करतेय की काय अशी शंका आहे. कारण शिवानीनेच नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओतून तशी हिंट दिली आहे.

शिवानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती साड्यांच्या दुकानातून असून वेगवेगळ्या साड्या ड्रेप करुन पाहत आहेत. सोबतच ती याचं व्हिडिओ शूटही घेत आहे. ही साडी खरेदी कशासाठी असा प्रश्न पडला असेलच. शिवानीने व्हिडिओला दिलेल्या कॅप्शनमधून ती लग्न करतेय अशीच शंका येते. तिने लिहिले,'आईला या आठवड्यात पाठवलेले काही व्हिडिओ. २०२४ मध्ये काहीतरी विशेष.' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

शिवानीच्या या व्हिडिओवर अजिंक्यही हसला आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि ऋतुजा बागवेने व्हिडिओवर कमेंट केल्या आहेत. 'लगीनघाई','आम्हाला माहित आहे तू आणि अजिंक्य लग्न करत आहात' अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

सध्या मनोरंजनसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. प्रसाद-अमृता, स्वानंदी-आशिष, प्रथमेश-मुग्धा यांच्यानंतर शिवानीही लग्नबंधनात अडकणार असं तिच्या या व्हिडिओवरुन दिसतंय. अर्थात शिवानीने थेट तशी माहिती दिलेली नाही. त्यामुळे 2024 मध्ये नक्की विशेष काय आहे हे लवकरच कळेल.

Web Title: marathi actress Shivani Surve getting married in 2024 gave hint through latest video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.