शिवानीच्या सासूबाई साऱ्यांनाच आहेत ठावूक; तिच्या आईला कधी पाहिलंय का? पाहा मायलेकींचा झक्कास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 10:37 IST2022-05-09T10:36:51+5:302022-05-09T10:37:33+5:30

Shivani rangole: शिवानीच्या आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

marathi actress shivani rangole like mother like daughter look | शिवानीच्या सासूबाई साऱ्यांनाच आहेत ठावूक; तिच्या आईला कधी पाहिलंय का? पाहा मायलेकींचा झक्कास फोटो

शिवानीच्या सासूबाई साऱ्यांनाच आहेत ठावूक; तिच्या आईला कधी पाहिलंय का? पाहा मायलेकींचा झक्कास फोटो

मराठी कलाविश्वातील बहुचर्चित ठरलेलं शिवानी रांगोळे (Shivani rangole) आणि विराजस कुलकर्णी (virajas kulkarni) या जोडीचं अखेर मोठ्या थाटात लग्न पार पडलं. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर कमालीची चर्चा रंगली. या दोघांचं लग्न होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र, तरीदेखील त्यांची चर्चा काही थांबायचं नाव घेईना. यामध्येच आता शिवानीच्या आईचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अलिकडेच शिवानी आणि विराजस यांच्या लग्नाचं रिसेप्शन पार पडलं. या रिसेप्शन पार्टीतील काही फोटो शिवानीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने तिच्या आईसोबत आणि सासूबाई मृणाल कुलकर्णी यांच्यासोबतही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे या दोघींसोबतचे फोटो शेअर करत तिने मदर्स डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवानी शेअर केलेल्या फोटोमध्ये पहिल्यांदाच चाहत्यांना तिच्या आईची झलक पाहायला मिळाली. या फोटोमध्ये शिवानी आणि तिच्या आईने खास पोझ दिली असून यात शिवानी हुबेहूब तिच्या आईप्रमाणे दिसत असल्याचं पाहायला मिळालं. 

दरम्यान, शिवानी मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आतापर्यंत तिने अनेक नाटक, मालिकांमध्ये काम केलं आहे. शिवानी आणि विराजस यांचं लव्ह मॅरेज असून जवळपास ५ वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर या जोडीने लग्नगाठ बांधली.

Web Title: marathi actress shivani rangole like mother like daughter look