धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2022 13:38 IST2022-03-18T13:35:51+5:302022-03-18T13:38:47+5:30

मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार रंगपंचमीच्या रंगामध्ये रंगले आहेत. 

Marathi actress Sanskruti Balgude share her rang panchami pics on social media | धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग

धरती है लाल आज, अम्बर है लाल ….मराठी सिनेसृष्टीतील संस्कृती बालगुडेवर चढला रंगपंचमीचा रंग

कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनमुळे गेल्या दोन वर्षांपासून रंगपंचमी नेहमीसारखी साजरी करता आली नाही. मात्र यंदाच्या वर्षी रंगांची जोरदार उधळण होतेय.  मराठी सिनेइंडस्ट्रीतील कलाकार रंगपंचमीच्या रंगामध्ये रंगले आहेत. 

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडेने फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये संस्कृतीच्या चेहऱ्यावर सुका रंग लावलेला दिसतोय.  धरती है लाल आज, अम्बर है लाल उड़ने दे गोरी गालों का गुलाल….. “ असे कॅप्शन तिने हे फोटो शेअर करताना दिले आहे. चाहत्यांची तिच्या या फोटोंवर लाईक्स करत तिला रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर संस्कृती लवकरच ‘८ दोन ७५’ या सिनेमात शुभंकर तावडेसोबत दिसणार आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अभिनेत्री संस्कृती बालगुडेकडे आहे. तिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. अनेक सिनेमे न स्वीकारता सिलेक्टिव्ह राहायला संस्कृतीला आवडते.

पुण्यात शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाच्या आवडीने तिची पावले मुंबईकडे वळली. ती नृत्यात पारंगत असून तिच्या नृत्याचे अनेक शो भारतात आणि भारताबाहेर झाले आहेत. तिची पिंजरा ही मालिका चांगलीच गाजली होती. यासोबतच तिने एफयुः फ्रेंडशिप अनलिमिटेड, शॉर्टकट, भय यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

Web Title: Marathi actress Sanskruti Balgude share her rang panchami pics on social media