ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,"...जडला का जीव हा समजेना"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 12:27 IST2020-02-06T12:21:54+5:302020-02-06T12:27:20+5:30

मराठी सिनेजगतात सध्या लग्नाचे वारे वाहता येत.

Marathi actress sanskruti Balgude fall in love | ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,"...जडला का जीव हा समजेना"

ही मराठी अभिनेत्री पडली प्रेमात ? म्हणतेय,"...जडला का जीव हा समजेना"

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे हॉट आणि ग्लॅमरस फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. नुकतेच तिने निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये संस्कृतीचे सौंदर्याला चार चांद लागले आहेत. संस्कृतीचे सोज्वळ सौंदर्य तिच्या फॅन्सनादेखील भावला आहे.  तिच्या या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. या फोटोला संस्कृतीने ''प्रीत ही, रीत ही उमजेना, जडला का जीव हा समजेना, कशी सांगू मी, कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे...” असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे या कॅप्शनवरुन संस्कृती कोणाच्या प्रेमात पडली आहे का असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या प्रश्नाच उत्तर संस्कृतीच देऊ शकते.


तिचे सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टाईलने संस्कृतीने बालगुडेने रसिकांवर मोहिनी घातली आहे. सांगतो ऐका' या सिनेमानंतर निवडुंग, शिव्या, एफयु असे संस्कृतीचे विविध सिनेमा रुपेरी पडद्यावर झळकले आहेत.


संस्कृती शेवटची 'सर्व लाइन व्यस्त आहेत' या चित्रपटात दिसली होती.या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमात संस्कृती व्यतिरिक्त सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, महेश मांजरेकर, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत आणि गौरव मोरे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

Web Title: Marathi actress sanskruti Balgude fall in love