सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...'

By देवेंद्र जाधव | Updated: September 19, 2024 13:41 IST2024-09-19T13:39:12+5:302024-09-19T13:41:20+5:30

मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरने लोकमत फिल्मीशी बोलताना बिग बॉस मराठीबद्दल तिचं मत मांडलंय (sai tamhankar, bigg boss marathi 5)

marathi actress Sai Tamhankar talk about varsha usgaonkar nikki tamboli fight in bigg boss marathi 5 | सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...'

सई ताम्हणकर बिग बॉस बघते का? अभिनेत्री म्हणाली- 'वर्षाताई आणि निक्कीचं भांडण झालं तेव्हा...'

सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. 'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'क्लासमेट्स' अशा विविध सिनेमांमधून सईने अभिनय केलाय. सई ताम्हणकरने केवळ मराठीत नव्हे तर हिंदी मनोरंजन विश्वातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सई ताम्हणकरची नवीन वेबसीरिज 'मानवत मर्डर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यानिमित्ताने सईने लोकमत फिल्मीशी दिलखुलास गप्पा मारल्या.

सई बिग बॉस मराठीबद्दल काय म्हणाली?

सई ताम्हणकरला यावेळी सध्या चर्चेत असलेल्या बिग बॉस मराठीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बिग बॉस बघते का विचारताच सई म्हणाली, "मी बिग बॉस फॉलो करत नाही. पण वर्षाताई आणि निक्की तांबोळी हा विषय रील्सच्या माध्यमातून थोडाफार कळाला. मला खूप आवडलं की वर्षाताई कितीही चिडल्या तरीही त्यांची भाषा आणि त्यांचा संयम सुटत नाही. आणि हे खूप गोड वाटलं मला. वर्षाताईंची ही बाजू आम्हाला माहित असण्याचं काहीच कारण नाही. वर्षाताईंसोबत मला एकदाच काम करण्याची संधी मिळाली. त्याच्यानंतर काहीच नाही. त्यामुळे त्यांची ही बाजू बघायला मजा आली."


सईच्या नवीन वेबसीरिजविषयी

आशिष बेंडे दिग्दर्शित बहुचर्चित 'मानवत मर्डर' ही वेबसीरिज ४ ऑक्टोबरला सोनी लिव्ह या ओटीटीवर रिलीज होतेय. या वेबसीरिजमध्ये मराठीमधील सुपरस्टार अभिनेत्री सई ताम्हणकर समिंद्री ही भूमिका साकारत आहे. या वेबसीरिजमध्ये दिग्गज कलाकारांची फौज आहे. सईसोबतच आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे, सोनाली कुलकर्णी हे कलाकार वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत होते. महाराष्ट्रात घडलेल्या सत्य घटनेवर वेबसीरिज आधारीत आहे.

 

Web Title: marathi actress Sai Tamhankar talk about varsha usgaonkar nikki tamboli fight in bigg boss marathi 5