सई ताम्हणकरने केले बिकनीमध्ये सेक्सी फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 15:08 IST2019-08-06T15:03:22+5:302019-08-06T15:08:01+5:30

सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामला एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला चक्क ती बिकनीत पाहायला मिळत आहे.

marathi actress sai tamhankar bikini picture got viral | सई ताम्हणकरने केले बिकनीमध्ये सेक्सी फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड

सई ताम्हणकरने केले बिकनीमध्ये सेक्सी फोटोशूट, फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड

ठळक मुद्देकाळ्या रंगाच्या बिकनीत सई सेक्सी दिसत असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत सई बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. सई सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या नेहमीच संपर्कात असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. सई ताम्हणकर मराठी रसिकांची दिलों की धडकन म्हणून ओळखली जाते.

सईने नुकताच तिच्या इन्स्टाग्रामला एक बोल्ड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत आपल्याला चक्क ती बिकनीत पाहायला मिळत आहे. काळ्या रंगाच्या बिकनीत सई सेक्सी दिसत असून तिच्या या फोटोची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या फोटोत सई बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत असल्याचे तिचे फॅन्स तिला प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत. हा फोटो सईने इन्स्टावर शेअर करून काहीच दिवस झाले असले तरी या फोटोला १ लाख ३० हजाराहून अधिक लाईक्स मिळाले आहेत तर अनेकांनी तिच्या फोटोवर कमेंट देखील केले आहेत.

सई लवकरच वैभव तत्त्वादीसोबत 'पाँडेचेरी' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात सईसह वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी झळकणार आहेत. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग पाँडेचेरीमध्ये करण्यात आले आहे. सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांनी या चित्रपटाची कथा लिहली असून हा एक कौटुंबिक विषयावर आधारित चित्रपट आहे.

सई ताम्हणकर ही मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने दुनियादारी, बालक पालक, वजनदार यांसारख्या मराठी चित्रपटात तर हंटर, गजनी यांसारख्या हिंदी चित्रपटातही खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिने हिंदीमध्ये साकारलेल्या भूमिकांचे देखील तितकेच कौतुक झाले आहे. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सईचा आगामी चित्रपट कधी भेटीस येणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. 

Web Title: marathi actress sai tamhankar bikini picture got viral