"कल रात मेरे घर चोर आया...", रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 13:00 IST2024-02-25T12:59:06+5:302024-02-25T13:00:36+5:30

रिंकू राजगुरूचा व्हिडिओ पाहून नेटकरी अवाक्, कमेंट करत म्हणाले...

marathi actress rinku rajguru make reel video mere ghar aaya ek chore goes viral | "कल रात मेरे घर चोर आया...", रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडिओ

"कल रात मेरे घर चोर आया...", रिंकू राजगुरूने शेअर केला व्हिडिओ

महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजे रिंकू राजगुरू चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत असते. अगदी साधी आणि तितकीच सुंदर असलेली रिंकू नेहमीच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असते. 'सैराट' म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या रिंकूला पहिल्याच सिनेमाने प्रसिद्धीझोतात आणलं. आजही तिची लोकप्रियता कायम आहे. रिंकू सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नवीन प्रोजेक्टबाबत रिंकू चाहत्यांना पोस्टद्वारे अपडेट देत असते. तर अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते. 

आता रिंकूने पहिल्यांदाच रील व्हिडिओ शेअर केला आहे. रिंकूने "कल रात आया मेरे घर एक चोर..." या ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत रिंकू त्या गाण्यानुसार अभिनय करताना दिसत आहे. "रील बनवण्याचा पहिलाच प्रयत्न" असं कॅप्शन रिंकूने या व्हिडिओला दिलं आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. रिंकूच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. "वो चोर मै था", असं म्हणत एका नेटकऱ्याने हसण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत.

 

तर "खूप गोड", "आर्चीची वेगळीच अदा" अशा कमेंटही चाहत्यांनी केल्या आहेत. "तू नेहमीच छान करतेस", "क्युटी विथ ब्युटी" अशा कमेंटही आहेत. रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  'सैराट'मधून घराघरात पोहोचलेल्या रिंकूने नंतर अनेक सिनेमात काम केलं. 'मेकअप', 'आठवा रंग प्रेमाचा', 'कागर', 'झुंड' या सिनेमात रिंकू दिसली. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' या सिनेमात रिंकूने महत्त्वाची भूमिका साकारली होती. 

Web Title: marathi actress rinku rajguru make reel video mere ghar aaya ek chore goes viral