परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 17:41 IST2022-04-05T17:36:08+5:302022-04-05T17:41:13+5:30

प्रियाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.

Marathi actress Priya Bapat share her stunning photo's on social media goes viral | परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

परी हूँ मैं ! प्रिया बापटचे हे फोटो बघून उमेश कामतच काय तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

उत्तम अभिनय आणि तितकाच खेळकर स्वभाव यामुळे प्रिया बापटने रसिकांच्या मनात वेगळेत स्थान निर्माण केले आहे. करिअरची सुरुवात केल्यापासून प्रियाने आतापर्यंत तिच्या यशाचा आलेख कायम उंच ठेवला आहे. त्यामुळे तिला आज मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावंत अभिनेत्रींपैकी एक समजले जाते.

सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.प्रिया अनेकवेळा पती उमेश कामतसोबतचे फोटो शेअर करत असते. यावेळी प्रियाने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. प्रियाने जांभळ्या रंगाच्या लेंहेंग्यातले फोटो शेअर केलेत.. यात प्रिया खूपच ग्लॅमरस दिसतेय. फोटोंमध्ये प्रिया वेगवेगळ्या पोझ देताना दिसतेय. प्रियाचे या फोटोंवर चाहते फिदा झालेत. ब्युटीफुल, क्वीन,सुपर स्टनिंग, अशा कमेंट तिच्या या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत.

साधारण पाच वर्षांची असता पासून प्रियाने अभिनयाला सुरूवात केली आहे. चल रे भोपळ्या टुणूक टुणूक नावाच्या शाळेच्या नाटकात तिने म्हातारीची भूमिका केली होती. या भुमिकेसाठी तिला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. तेव्हा अभिनेत्री म्हणून करिअर वगैरे करण्याचा विचार तिच्या मनात देखील नव्हता. अभिनय म्हणजे काय हे फार कळतंही नसताना फक्त आपल्या कामाचं कौतुक होतंय, सर्वांना आवडतंय यातच आनंद मानून तिने आपला अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला. 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.
 

Web Title: Marathi actress Priya Bapat share her stunning photo's on social media goes viral