समुद्रकिनारी साडी नेसून मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा हॉट अंदाज, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 14:00 IST2024-04-05T13:58:59+5:302024-04-05T14:00:05+5:30

बीचवर साडीत प्रार्थनाने व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.

marathi actress prarthana behere hot video in saree shreyas talpade commented | समुद्रकिनारी साडी नेसून मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा हॉट अंदाज, व्हिडिओ व्हायरल

समुद्रकिनारी साडी नेसून मराठमोळ्या प्रार्थना बेहेरचा हॉट अंदाज, व्हिडिओ व्हायरल

'पवित्रा रिश्ता' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलेल्या प्रार्थनाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेने प्रार्थनाला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. या मालिकेतील तिची भूमिका प्रचंड गाजली. प्रार्थना सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेटही ती चाहत्यांना देत असते. नुकतंच प्रार्थनाने तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 

या व्हिडिओत प्रार्थनाने हिरव्या रंगाच्या साडीत दिसत आहे. समुद्रकिनारी साडीत प्रार्थनाने व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओत तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.  प्रार्थनाचा हा हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्रार्थनाचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या व्हिडिओवर श्रेयस तळपदेनेही इमोजी पोस्ट करत कमेंट केली आहे. 

एकता कपूरच्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतून प्रार्थनाला पहिला ब्रेक मिळाला होता. या मालिकेत तिने वैशाली ही भूमिका साकारली होती. पहिल्याच मालिकेने प्रार्थनाला प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेनंतर प्रार्थनाची अनेक मराठी सिनेमांमध्ये वर्णी लागली. 'कॉफी आणि बरंच काही', 'मितवा', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'फुगे', 'व्हॉट्स अप लग्न', 'जय महाराष्ट्र ढाबा बठिंडा' अशा अनेक सिनेमांमध्ये प्रार्थना मुख्य भूमिकेत दिसली. 

Web Title: marathi actress prarthana behere hot video in saree shreyas talpade commented