"चित्रपटाचं नाव महिनाभर आधी माहित असताना...",'मनाचे श्लोक'बद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 10:37 IST2025-10-13T10:30:43+5:302025-10-13T10:37:47+5:30
"लोकशाही असलेल्या भारतात...",'मनाचे श्लोक' चित्रपटाच्या टीमला प्राजक्ता माळीचा पाठिंबा, पोस्ट शेअर करत मांडलं मत

"चित्रपटाचं नाव महिनाभर आधी माहित असताना...",'मनाचे श्लोक'बद्दल प्राजक्ता माळीची प्रतिक्रिया, म्हणाली...
Prajakta Mali Reaction On Manache Shlok Movie: गेल्या काही दिवसांपासून मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित 'मनाचे श्लोक' चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका दिवसातच त्याचे शो काही ठिकाणी बंद पाडण्यात आले. त्याचं कारण म्हणजे चित्रपटातं शीर्षक ठरलंय. मनाचे श्लोक चित्रपटाच्या नावाला काही हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला होता तसंच याबद्दल याचिका देखील देखील दाखल करण्यात आली होती. मात्र, ९ ऑक्टोबरला उच्च न्यायालयाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला खरा मात्र,वाद आणखी उफाळला. दरम्यान, या चित्रपटाला पाठिंबा देण्यासाठी मराठी कलाकार एकवटले आहेत. अशातच अभिनेत्री प्राजक्ता माळीने याप्रकरणी प्रतिक्रिया देत तिचं मत मांडलं आहे.
दरम्यान, 'मनाचे श्लोक' चित्रपटाला एकंदरीत होणारा विरोध पाहता अभिनेत्री मृण्मयी देशपांडे त्याचं प्रदर्शन आणि नाव बदलण्याचा मोठा निर्णय आहे. आता यासंदर्भात अभिनेत्री प्राजक्ता माळीने पोस्ट शेअर करत त्यामध्ये लिहिलंय," मनाचे श्लोक' चित्रपटाचं प्रमोशन त्यानिमित्ताने चित्रपटाचं नाव किमान महिनाभर माहित असताना सेन्सॉर बोर्डने सर्टिफिकेट दिल्यानंतर, सुप्रीम कोर्टने क्लीन चीट दिली असातानाही, चित्रपटगृहात घुसून चित्रपट बंद पाडला गेला."
त्यानंतर पुढे प्राजक्ताने म्हटलंय," आपण लोकशाही असलेल्या भारतात, अतिशय सुस्कांरी असलेल्या महाराष्ट्रात आहोत यावर विश्वास बसत नाही. तीव्र निषेध...!" अशा आशयाची पोस्ट तिने शेअर केली आहे.
'मनाचे श्लोक' हा चित्रपट १० ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात आला होता. परंतु, चित्रपटाच्या शीर्षकाचं रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोकाशी साधर्म्य असल्याचं काहींचं म्हणणं आहे, त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला तीव्र विरोध केला गेला. याच पार्श्वभूमीवर मृण्मयीने चित्रपटाचं राज्यभरातील प्रदर्शन स्थगित करत येत्या १६ ऑक्टोबरला चित्रपट नवीन नावाने प्रदर्शिक केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटात मृण्मयी देशपांडेसह राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब ही तरुण कलाकारांची तगडी फळी आहे. त्यांच्यासोबतच लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर अशा तगड्या कलाकारांची फळी आहे.